Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अज्ञात व्यक्तींनी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

अज्ञात व्यक्तींनी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महिलांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अज्ञात व्यक्तींनी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील महिलांनी वेळीच सावधगिरी बाळगून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील राऊळ गल्लीमध्ये राहणारे आणि मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या घरात त्यांची आई नंदकोर राऊळ आणि बहीण किरण राऊळ रात्री झोपलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे २.३० वाजता घराबाहेर हालचाल झाल्याचा आवाज आणि पेट्रोलचा तीव्र वास येऊ लागला. काही क्षणांतच घराच्या दरवाजाजवळ आग लागल्याचे दिसून आले.

धुराचा वास आल्याने नंदकोर राऊळ जाग्या झाल्या आणि त्यांनी दरवाजाचा पडदा जळताना पाहिला. सुरुवातीला शॉर्ट सर्किटचा संशय आला; मात्र दरवाजा उघडल्यावर बाहेर पेट्रोलची बाटली आणि आगपेटी दिसून आली. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, परिसरातील एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर फिरताना दिसत आहेत. त्यांनी गणपती मंदिराजवळ मोटारसायकल उभी करून गल्लीच्या दिशेने जाताना दृश्यात कैद झाले आहे. या घटनेत नियोजनपूर्वक कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी किरण राऊळ यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भरवस्तीत एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर जाळपोळीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संशयित आरोपींना अटक कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add