Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»हे पंतप्रधानांमुळे शक्य भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राने बळ दिले आहे.

ताज्या बातम्या

हे पंतप्रधानांमुळे शक्य भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राने बळ दिले आहे.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे दमदार पाऊल !फडणवीसांकडून कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राने बळ दिले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षेत्रात क्रांती घडत आहे, ज्यामुळे पुढील वाटचालीस दिशा मिळेल. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे.

गेल्या वर्षी दावोस येथे महाराष्ट्राने सोळा लाख कोटी रुपयांचे करार केले होते, त्यापैकी पंचाहत्तर टक्के करार सक्रिय झाले आहेत आणि ते परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा करार श्री. भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्यासोबत केला होता, ज्याचे प्रत्यक्ष उद्घाटन आज करण्यात आले. टीका करणाऱ्यांना शब्दांनी नाही, तर कृतीने उत्तर द्यावे लागते आणि आजचा हा उद्योग त्याच कृतीचे उदाहरण आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. या उद्योगामुळे परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आणि तंत्रज्ञान दोन्ही एकाच वेळी महाराष्ट्रात आले आहेत.

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती यापूर्वी मुंबई, एमएमआर आणि पुणे या क्षेत्रांपुरती मर्यादित होती. ही प्रगती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांमध्ये पोहोचावी यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रत्येक भागात नवीन औद्योगिक केंद्रे (इंडस्ट्रियल मॅग्नेट) तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सुपे एमआयडीसी आणि उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे गुंतवणूक आणण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add