Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळ विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा

ताज्या बातम्या

भुसावळ विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा; राजभाषा धोरणावर मार्गदर्शन

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटन मंडळ यांत्रिक अभियंता तथा संपर्क राजभाषा अधिकारी युनुस अन्सार मकानू, राजभाषा उप महाप्रबंधक डॉ. विभावरी गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेची विषयवस्तू अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले.

दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. गोरे यांनी “राजभाषा धोरण” या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. त्यांनी संविधानातील कलम ३४३ ते ३५१, राजभाषा अधिनियम १९६३ आणि राजभाषा नियम १९७६ यातील प्रमुख तरतुदी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगितल्या.

व्याख्यानात कार्यालयांमध्ये हिंदीचा प्रभावी वापर वाढवण्याचे महत्त्व आणि राजभाषेच्या प्रचारासाठी केलेले प्रयत्न यावरही भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या राजभाषा संबंधी प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.

हिंदीचा प्रभावी उपयोगासाठी मार्गदर्शन

या कार्यशाळेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात हिंदीचा प्रभावी उपयोग करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे कामकाजात निश्चितच सुधारणा होण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add