Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»चिमुकल्यांनी उभारले शिवरायांचे भव्य किल्ले सर्जनशीलतेचा जल्लोष !

जळगाव

चिमुकल्यांनी उभारले शिवरायांचे भव्य किल्ले सर्जनशीलतेचा जल्लोष !

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला.

छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी साकारले आकर्षक किल्ले

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला. कार्डबोर्ड व इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आकर्षक व भव्य किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या.

लहान वयातही विद्यार्थ्यांनी बुरूज, तटबंदी, दरवाजे तसेच भगवे ध्वज यांची कल्पक मांडणी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक किल्ल्यातून शिवकालीन वैभवाची झलक पाहायला मिळाली.हा उपक्रम मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड, देशभक्तीची भावना व सर्जनशीलतेचा विकास घडून आला.या उपक्रमामुळे शाळेचा परिसर देशभक्तीच्या आणि आनंदाच्या वातावरणाने भारावून गेला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add