Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कुऱ्हे पानाचे येथे बहारदार बाल सांस्कृतिक कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

ताज्या बातम्या

कुऱ्हे पानाचे येथे बहारदार बाल सांस्कृतिक कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

कुऱ्हे पानाचे येथे “कलातरंग”मध्ये माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी दिला मुलांना आत्मविश्वासाचा मंत्र

भुसावळ प्रतिनिधी : कुऱ्हे पानाचे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला, संस्कार व आत्मविश्वासाचा विकास करावा. “कलातरंग म्हणजे मुलांच्या मनातील रंगांचा उत्सव आहे. शिक्षणाबरोबर कलागुण जोपासल्यास व्यक्तिमत्त्व उजळते,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. ते तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील जिल्हा परिषद मुलांची-मुलींची व उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कलातरंग” या बाल सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार होते. विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले, “मी स्वतः याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. जिल्हा परिषद शाळा संस्कार देणाऱ्या शाळा आहेत.” ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ देण्यासाठी शिक्षक व पालकांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नाटिका, आदिवासी व वारकरी सादरीकरण, देशभक्तीपर तसेच शिवमल्हारी नृत्य प्रकारांतून तिन्ही शाळेच्या शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन आपल्या कला अविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, माजी सरपंच कविता उंबरकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता चौधरी, उपाध्यक्ष गणेश शिंदे, सावित्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विलास रंदाळे, गौतम मेघे, भागवत शिंदे, रमाकांत पाटील, प्रमोद उंबरकर ,मुख्याध्यापिका शारदा मसाने (मुलींची शाळा), मुख्याध्यापिका वनिता सोनवणे (मुलांची शाळा), मुख्याध्यापक परवीन शेख (उर्दू शाळा), उपशिक्षक मेघश्याम सपकाळे, विजया परदेशी, अनिता भोई, संतोष तायडे, शालिनी चौधरी यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या .सूत्रसंचालन कु. कृष्णाली पाटील, कु. भूमिका उंबरकर, कु. डिंपल पाटील, कु. चित्राक्षी शिंदे व कु. जान्हवी पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपशिक्षक मेघश्याम सपकाळे यांनी तर आभार मुख्याध्यापिका वनिता सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले .

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add