Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»तहसिल कार्यालयातर्फे लाभार्थ्यानी हयात व उत्पन्न प्रमाण जमा करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

तहसिल कार्यालयातर्फे लाभार्थ्यानी हयात व उत्पन्न प्रमाण जमा करण्याचे आवाहन

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन तसेच राज्य पुरस्कृत योजनेतंर्गत संजय गांधी निराधार योजना,

भुसावळ प्रतिनिधी : येथील तहसिल कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे की केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन तसेच राज्य पुरस्कृत योजनेतंर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील पत्र क्रमांकः केपूयो-2025/प्र.क्र.42/विसयो दिनांक 28/04/2025, शासन निर्णय क्रमांक विसयो-2018/प्र क्र 62/विसयो दि. 20/08/2019 अन्वये दरवर्षी पात्र लाभार्थीचे हयात प्रमाण पत्र तसेच उत्पन्न प्रमाण पत्र घेणे बाबत निर्देशित केलेले आहे.

सबब इंगायो विधवा, वृध्दापकाळ, दिव्यांग लाभार्थानी दि. 15/03/2026 पूर्वी जवळच्या सेतु केंद्रात, ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात जावुन डिजीटल हयात प्रमाणपत्र त्वरीत काढावे आणि डिजीटल हयात प्रमाण पत्र तहसिल कार्यालयात दि. 15/03/2026 पुर्वी जमा करावे. राज्य पुरस्कृत संगांवो निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र दि. 15/03/2026 पूर्वी तहसिल कार्यालय किंवा ग्राम महसुल अधिकारी/तलाठी यांचे कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. हयात प्रमाणपत्र जमा न केल्यास एप्रिल 2026 पासून आपले अनुदान बंद करण्यात येईल याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

लाभार्थी यांची यादी ग्राम महसुल अधिकारी/तलाठी यांचे सजेवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. काही अडचण असल्यास ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)/ महसुल सेवक (कोतवाल) किंवा तहसिल कार्यालय भुसावळ येथे संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा. असे तहसील भुसावळ यांनी कळविले आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add