Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»सफाईगारांचे उपोषण ७ व्या दिवशी सुटले आणि प्रशासकीय काळात फाईल गहाळ झाल्याचे आले समोर.

राजकारण

सफाईगारांचे उपोषण ७ व्या दिवशी सुटले आणि प्रशासकीय काळात फाईल गहाळ झाल्याचे आले समोर.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल नगरपरिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तर्फे बेमुदत उपोषण गेल्या ७ दिवसापासून सुरू होते

यावल प्रतिनिधी : यावल नगरपरिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तर्फे बेमुदत उपोषण गेल्या ७ दिवसापासून सुरू होते ते उपोषण सोडविण्यासाठी आज लोकनियुक्त अध्यक्षा यांच्यासह सत्ताधारी व विरोधी सदस्यांना यश प्राप्त झाले असले तरी घनकचरा संकलन ठेका टेंडर संदर्भातील फाईल गहाळ झाल्याचे खापर प्रशासक काळातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फोडण्यात आल्याने घनकचरा ठेकेदाराच्या कामकाजाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार यावल हे विविध मागण्यांसाठी यावल नगरपालिकेसमोर गेल्या ७ दिवसापासून उपोषणाला बसले होते.तरी यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ.छायाताई अतुल पाटील यांच्या सह सत्ताधारी नगरसेवक सह विरोधी गटाचे नगरसेवक व संघटनेचे पदाधिकारी तानसेन बिवाल व नगरपालिकेचे अधिकारी यांनी योग्य मार्ग काढत कंत्राटी कर्मचार्यांचे उपोषण सोडवले.परंतु माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या जाहीर खुलासानुसार,आणि मुलाखत दिलेल्या माहितीनुसार घनकचरा संकलन ठेक्याची फाईल प्रशासकीय काळात भोंगळ कारभारामुळे टेंडर फाईल गहाळ झाली असल्याचे सांगून त्यांनी तत्कालीन प्रशासकीय काळातील प्रभारी स्वच्छता निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकारी,

कर्मचाऱ्याच्या डोक्यावर ओला व सुका कचरा संकलन करण्याचे भोंगळ कारभाराचे खापर फोडल्याने यावल शहरात घनकचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून नगरपरिषद कार्यालयातून महत्वाची फाईल गहाळ झाल्याने याबाबत आता कुपोषण सोडविण्याच्या वेळी उपस्थित असलेले विद्यमान लोकनियुक्त नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष,तसेच सत्ताधारी विरोधी गटातील सदस्य फाईल गहाळ करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add