
झोपेची खाट टाकून अनोखे होणारे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या तत्परतेने स्थगित.
भुसावळ प्रतिनिधी – सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने तात्काळ कारवाई होण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारदार प्रमोद पाटील यांनी दिला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी तक्रारीची दखल घेत भुसावळ तहसीलदार आणि मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांना लेखी पत्र काढून तात्काळ स्थळ निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल सत्वर सादर करावा असे कळविल्याने खाट टाकून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले .
भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार भुसावळ आणि मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांना दिलेल्या लेखी पत्रात सर्वे क्र.११५/१/अ भुसावळ येथील श्रद्धा नगर संत गजानन महाराज देवस्थान येथील रहिवास असून त्या ठिकाणी अतिक्रमणाबाबत प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी तक्रार केली आहे. अर्जात नमुद मुद्याच्या अनुषंगाने स्थळ निरीक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी व ते अर्जदारास परस्पर कळवावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सत्वर सादर करावा असे कळविल्याने भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी आणि भुसावळ तहसीलदार प्रत्यक्षात काय कार्यवाही करतात याकडे तक्रारदार यांच्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.


