Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»टार्गेटच्या तणावाला बळी! जळगावात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा मृत्यू; MSMRA चा संतप्त कँडल मार्च

ताज्या बातम्या

टार्गेटच्या तणावाला बळी! जळगावात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा मृत्यू; MSMRA चा संतप्त कँडल मार्च

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

कंपनीविरोधात कारवाईची मागणी; सहकाऱ्यांकडून अश्रुपूर्ण श्रद्धांजली

जळगाव – महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन जळगाव युनिटच्या वतीने स्वर्गीय अजितेश यांच्या दुर्दैवी निधनाच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.शहरातील काव्य रत्नावली चौक येथे आयोजित या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निषेध व्यक्त करत सर्वांनी स्व. अजितेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपस्थितांनी औषध कंपन्यांमधील वाढता टार्गेटचा ताण, मानसिक दबाव आणि कामाच्या कठीण अटी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

MSMRA च्या वतीने दिलेल्या निवेदनात कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या कामाच्या अटी सुधाराव्यात, असेही नमूद करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितेश यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add