Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अनोळखी तरुणाचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे प्रयत्न

क्राईम

अनोळखी तरुणाचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे प्रयत्न

Editorial DeskBy Editorial DeskMay 19, 2026Updated:May 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | धावत्या ट्रेनमध्ये एक ३० वर्षीय अज्ञात पुरुष इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, रेल्वे पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

​रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार  १८ मे रोजी ट्रेन नंबर ११०३१ अमृत भारत एक्सप्रेसच्या पाठीमागून सहाव्या जनरल डब्यात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती जळगाव रेल्वे स्टेशनचे ऑन ड्युटी स्टेशन मास्टर मोरे यांनी संध्याकाळी ६ वाजता रेल्वे पोलिसांना दिली. ती ट्रेन रात्री ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता, रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या बेशुद्ध इसमाला प्लॅटफॉर्मवर उतरवले. त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले.

मात्र, रात्री ७:३० वाजण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. ​सध्या सदर अनोळखी मयताचे प्रेत ओळख पटवण्यासाठी जळगाव शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात राखून ठेवण्यात आले आहे. या वर्णनाचा कोणताही नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्यास त्यांनी जळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अंमलदार पोहेकॉ किरण वसंत बारी यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add