Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मानधनाविना कंत्राटी कर्मचारी आक्रमक; पाणी व स्वच्छता विभागाचे राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन सुरू

क्राईम

मानधनाविना कंत्राटी कर्मचारी आक्रमक; पाणी व स्वच्छता विभागाचे राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन सुरू

Editorial DeskBy Editorial DeskJune 2, 2026Updated:June 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांचे मानधन रखडल्याने, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने १ जूनपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

​ग्रामीण भागातील स्वच्छ भारत अभियान, पाणी पुरवठा योजना आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करणाऱ्या गट व समूह समन्वयकांना डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या पाच महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. जून महिना उजाडला तरीही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले असून, घरखर्च आणि मुलांचे शिक्षण भागवणे कठीण झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

​थकीत मानधन तात्काळ बँकेत जमा करावे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १ ते ५ जून दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जात आहे. त्यानंतर, ८ जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

​या आंदोलनामुळे पाणी व स्वच्छता विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासनच जबाबदार राहील, असा इशारा राज्याध्यक्ष विलास निकम, सचिव जयंत वर्मा, जिल्हाध्यक्ष शिरीष तायडे व सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add