Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»केवायसीच्या नावाखाली १०० रुपयांची लाच; एसीबीची मोठी कारवाई, २६ हजारांची रोकड जप्त

क्राईम

केवायसीच्या नावाखाली १०० रुपयांची लाच; एसीबीची मोठी कारवाई, २६ हजारांची रोकड जप्त

Editorial DeskBy Editorial DeskJune 5, 2026Updated:June 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या मोफत सुरक्षा संच वाटपामध्ये लाचेची मागणी करणाऱ्या एका २० वर्षीय खाजगी महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. भाग्यश्री विजय पाटील (रा. सामनेर, ता. पाचोरा) असे लाच घेणाऱ्या खाजगी तरुणीचे नाव असून, तिच्याविरुद्ध जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील एका मूळ तक्रारदाराने ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ’ यांच्या योजनेंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा संच घेण्यासाठी त्यांना वावडदा (ता. जि. जळगाव) येथील केंद्रावर उपस्थित राहण्याचे पत्र मिळाले होते. तक्रारदार ४ जून रोजी संच घेण्यासाठी गेले असता, केंद्रावरील कर्मचारी भाग्यश्री पाटील हिने ‘केवायसी’ करण्यासाठी दोन फॉर्म्स विकत घ्यावे लागतील असे सांगून १०० रुपयांची लाच मागितली. 

​वास्तविक पाहता, शासनाच्या नियमांनुसार हा संच लाभार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य देणे बंधनकारक आहे. लाचेची मागणी झाल्यामुळे सजग तक्रारदाराने तत्काळ जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत खंडू नागरे आणि पथकाने वावडदा येथील केंद्रावर यशस्वी सापळा रचला.

पंचांसमक्ष १०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना भाग्यश्री पाटील हिला ताब्यात घेण्यात आले. ​एसीबीच्या पथकाने घटनास्थळाची झडती घेतली असता, तेथे १३ हजार ६७० रुपये आणि झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यामध्ये १३ हजार १०० रुपये अशी एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केल्याचा संशय आहे. ही धडक कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत. 

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add