Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दारूच्या नशेत मित्राची हत्या; अपघाताचा बनाव रचणारे तिघे जेरबंद !

क्राईम

दारूच्या नशेत मित्राची हत्या; अपघाताचा बनाव रचणारे तिघे जेरबंद !

Editorial DeskBy Editorial DeskJune 21, 2026Updated:June 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोळन्हावी परिसरात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लावत यावल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या तपासातून हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे समोर आले.

या बाबत अधिक माहिती अशी की, 18 जून रोजी पहाटे पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) याचा मृतदेह रस्त्यावर आढळला होता. मृताच्या मित्रांनी ट्रकच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळी अपेक्षित प्रमाणात रक्त न सापडणे आणि इतर काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.

फॉरेन्सिक तपास, घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून पवन सोळंके याच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा कट्टा मारून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर नेऊन अपघाताचा बनाव रचण्यात आला होता.

या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (रा. डांभुर्णी) आणि लोकेश दिवाकर महाजन (रा. डांभुर्णी) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत बजाज, पोलीस निरीक्षक रंजनाथ धारबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या उल्लेखनीय तपासामुळे यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add