Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»सामाजिक बांधिलकी! मंगळग्रह सेवा संस्था आणि गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशनतर्फे भव्य नेत्र शिबिर संपन्न

आरोग्य

सामाजिक बांधिलकी! मंगळग्रह सेवा संस्था आणि गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशनतर्फे भव्य नेत्र शिबिर संपन्न

Editorial DeskBy Editorial DeskJune 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून रोजी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..

​या शिबिरामध्ये एकूण ७३ नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ यांच्यासह निशा शिंदे व प्राची गायकवाड यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची सखोल तपासणी केली. तपासणीअंती ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तत्पूर्वी, उपस्थित रुग्णांच्या हस्ते सर्व नेत्रतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

​शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व ३९ रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदी पूर्ण केल्यानंतर, त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले. संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या खास वाहन व्यवस्थेद्वारे हे रुग्ण दुपारी साडेचार वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पुढील उपचार केले जाणार आहेत.

​मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अशा भव्य मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले जाते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त मंडळ आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add