Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»निसर्गाचा अद्भूत चमत्कार! भडगाव तालुक्यात केळीच्या एकाच झाडाला तब्बल २०० कंबळ

क्राईम

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! भडगाव तालुक्यात केळीच्या एकाच झाडाला तब्बल २०० कंबळ

Editorial DeskBy Editorial DeskJune 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी । निसर्गाची किमया खरोखरच न्यारी असते याचा प्रत्यय भडगाव तालुक्यातील वाडे येथे आला आहे. येथे एका केळीच्या झाडाला एक नव्हे तर तब्बल २०० हून अधिक कंबळ लागल्याचा अद्भूत चमत्कार घडला आहे. या अनोख्या निसर्गाच्या चमत्काराची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या शेतात १ एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली आहे. अत्यंत मेहनत आणि कष्टाने त्यांनी ही केळीची बाग फुलविली आहे. सध्या ही बाग घडांनी चांगलीच बहरली आहे. मात्र, या बागेतील एका केळीच्या झाडाला चक्क एक नव्हे तर २१४ केळीचे कंबळ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्यतः एका केळीच्या झाडाला एकच कंबळ येते, तर काही दुर्मिळ प्रसंगी एका झाडाला २ ते ३ कंबळ लागल्याचे आजवर ऐकण्यात किंवा पाहण्यात आले आहे. मात्र येथे एकाच झाडाला २०० पेक्षा जास्त कंबळ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याशिवाय, वाडे येथील या शेतकऱ्याच्या शेतातील एका केळीच्या झाडाला तब्बल २४ केळीच्या घडासह फण्या लागलेल्या असून हे झाड सध्या चांगलेच पोसत आहे. हा निसर्गाचा एक अद्भूत आणि अवाक करणारा चमत्कार आहे. हा अनोखा आणि दुर्मिळ केळीचा कंबळ पाहण्यासाठी दररोज परिसरातील शेतकरी आणि नागरिक शेतात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत, अशी माहिती शेतकरी शांताराम गोठवाळ, नाना गोठवाळ आणि हेमराज परदेशी यांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add