Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दुर्दैवी घटना: जळगावात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

क्राईम

दुर्दैवी घटना: जळगावात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून, संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add