Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskJuly 27, 2026Updated:July 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील भारवडे येथे शेतातील मक्याच्या पिकाची नासधूस केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात दंगल, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दयाराम पाटील यांच्या शेतात संशयितांनी एकत्र येत मक्याची कणसे तोडून पिकाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना विरोध केल्यामुळे शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भडगाव पोलिसांनी १३ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील दंगल, बेकायदेशीर जमाव, मालमत्तेचे नुकसान आणि धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026

आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयात अधिकाऱ्यांच्या अपमानाच्या निषेधार्थ यावल येथे कामबंद आंदोलन

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add