Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»८३ लाखांचा भ्रष्टाचार! ममुराबाद ग्रामसभेत वादळ, ग्रामस्थांच्या आरोपांनंतर पोलिसांचा हस्तक्षेप

क्राईम

८३ लाखांचा भ्रष्टाचार! ममुराबाद ग्रामसभेत वादळ, ग्रामस्थांच्या आरोपांनंतर पोलिसांचा हस्तक्षेप

Editorial DeskBy Editorial DeskAugust 18, 2026Updated:August 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीच्या आयोजित ग्रामसभेत विकासकामे न करता तब्बल ८३ लाख रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ग्रामसभेत तुफान गोंधळ उडाला असून, वातावरण तापल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.

​सभेत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामसेवक नियमित गावात येत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच काही ग्रामस्थांनी धमक्या दिल्याचाही आरोप केल्याने सभेत प्रचंड गदारोळ झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.

​दरम्यान, हे सर्व आरोप सरपंच हेमंत चौधरी यांनी फेटाळून लावले आहेत. गावात अनेक विकासकामे झाल्याचा दावा करत त्यांनी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे मागवून पाहावीत आणि समाधान न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करावी, असे स्पष्ट केले. या वादळी ग्रामसभेमुळे ममुराबाद गावात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add