चाळीसगाव प्रतिनिधी | भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तेजस कोणार्क, धुळे रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
चाळीसगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांनी व संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आले असून, त्यासाठी ₹१ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
नमो उद्यानामध्ये नागरिकांच्या आरोग्य, मनोरंजन, विरंगुळा, सामाजिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन विविध आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी आधुनिक Play Equipment Area व EPDM Flooring, आकर्षक Sitting Area, Green Gym, Walking & Jogging Track, Yoga व Meditation Lawn, Open-Air Amphitheatre व Stage, Decorative Water Fountain, कमळाच्या आकाराचे आकर्षक Decorative Sculpture तसेच श्री गणेश मूर्ती व स्वतंत्र कार्यक्रमासाठी Stage Area यांचा समावेश आहे.
तसेच संपूर्ण परिसरात नियोजनबद्ध Landscaping, वृक्षारोपण व हिरवळ विकसित करून नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधांसह हे उद्यान विकसित करण्यात आले असून, मनोरंजन, व्यायाम, योग, बालमनोरंजन आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचा समन्वय साधणारे हे सर्वसमावेशक सार्वजनिक उद्यान ठरणार आहे.
या ‘नमो उद्यानाचे’ लोकार्पण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच अध्यात्म, कृषी, वैद्यकीय, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम’ अशी संकल्पना असलेल्या या उद्यानामुळे चाळीसगाव शहराच्या सार्वजनिक सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण, उपनगराध्यक्ष हर्षल देविदास चौधरी, मुख्याधिकारी हनमंत बनगर, शिक्षण सभापती करण ईश्वरसिंग पाटील, नगरसेविका मनिषा शेखर पाटील यांच्यासह नगरपरिषदेतील सर्व गटनेते, सभापती, नगरसेवक-नगरसेविका यांनी केले आहे.



