Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात १० दिवसांच्या चिमुकलीला निर्जनस्थळी सोडले; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी, मदत करणाऱ्या नागरिकाचे कौतुक!

क्राईम

जळगावात १० दिवसांच्या चिमुकलीला निर्जनस्थळी सोडले; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी, मदत करणाऱ्या नागरिकाचे कौतुक!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 22, 2026Updated:October 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव : शहरात अवघ्या दहा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला निर्जनस्थळी बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ९३ आणि बाल न्याय अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गिरणगाव पिंपळा रेल्वे पुलाजवळ, आजादनगर पिंपळाकडे जाणाऱ्या सार्वजनिक कच्च्या रस्त्याच्या बाजूला हे अर्भक आढळून आले. परिसरात मृत जनावरे टाकली जात असल्याने ही जागा बालिकेसाठी अत्यंत धोकादायक होती. अर्भकाच्या अंगाला मुंग्या लागत असल्याचे लक्षात येताच शिवाजी मधुकर गायकवाड यांनी तत्काळ बालिकेला स्वतःकडे घेत तिची काळजी घेतली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

या चिमुकलीची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त भेट दिली. बालिकेच्या प्रकृतीची व पुढील देखभालीची माहिती घेऊन आवश्यक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रसंगावधान राखून बालिकेला मदत करणारे ३५ वर्षीय शिवाजी गायकवाड यांचे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add