Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के! जळगावसह भुसावळ, वरणगाव, सावदा, मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये हादरे

क्राईम

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के! जळगावसह भुसावळ, वरणगाव, सावदा, मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये हादरे

Editorial DeskBy Editorial DeskNovember 14, 2026Updated:November 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, वरणगाव, सावदा, मुक्ताईनगर, रावेर आणि परिसरातील इतर भागांमध्ये हे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळच्या वेळी अचानक जमीन हादरल्याची जाणीव झाल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली, तर अनेकांनी एकमेकांना फोन करून भूकंपाच्या धक्क्यांबाबत माहिती घेतली. या घटनेमुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण होते.

दरम्यान, या घटनेला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दुजोरा दिला आहे. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली असली, तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मालमत्तेचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि इतर तांत्रिक तपशीलांबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

November 14, 2026

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add