Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

क्राईम

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 14, 2026Updated:November 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा ‘न्याय विश्वास फाउंडेशन’चे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी मारहाण झालेल्या रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. पीडित रिक्षाचालकाला सोबत घेऊन त्यांनी थेट जळगाव शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर त्याची बाजू मांडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात गजानन माळी या रिक्षाचालकाला एका कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपही संबंधित रिक्षाचालकाने केला आहे. कारचालक मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी असल्याने तक्रार करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना पीडिताने व्यक्त केली होती. त्यामुळे त्याने ॲड. अनिकेत निकम यांच्याकडे मदतीची मागणी केली.

रिक्षाचालकाची व्यथा जाणून घेत ॲड. निकम यांनी त्याला मदतीचा हात दिला. त्यानंतर ते स्वतः रिक्षाचालकाला सोबत घेऊन जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडिताला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. ॲड. निकम यांनी स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पीडिताची बाजू मांडल्याने रिक्षाचालकाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान; संयुक्त बचाव मोहिमेला यश!

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add