Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान; संयुक्त बचाव मोहिमेला यश!

क्राईम

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान; संयुक्त बचाव मोहिमेला यश!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 14, 2026Updated:November 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भोरटेक शेतशिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचाव मोहीम हाती घेतली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये, याची विशेष काळजी घेत बचावकार्य करण्यात आले.

अखेर अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. त्यामुळे बिबट्याला जीवदान मिळाले आहे. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे वन विभाग आणि पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

भोरटेक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा आणि त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

November 14, 2026

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add