Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा ! रघुनाथ पाटील यांचे अपीलही फेटाळले!

जळगाव

जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा ! रघुनाथ पाटील यांचे अपीलही फेटाळले!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 14, 2026Updated:November 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता अधिक बळकट झाली आहे. जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून महाजन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे रघुनाथ सखाराम पाटील यांना सलग दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधकांनीही फेटाळून लावला आहे.

जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात रघुनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज अवैध ठरवत बाद केला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी रघुनाथ पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. आपला उमेदवारी अर्ज वैध ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र, विभागीय सहनिबंधकांनीही त्यांचे अपील फेटाळल्याने महाजन यांच्या विरोधातील उमेदवारीचा मार्ग सध्या बंद झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय सहनिबंधक या दोन्ही स्तरांवर अर्ज बाद झाल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासाठी ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

दरम्यान, रघुनाथ पाटील यांच्यासमोर आता न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ते न्यायालयात जाणार का आणि न्यायालय यावर काय निर्णय देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्या तरी या घडामोडींमुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वाढली असून, अंतिम चित्र न्यायालयीन निर्णय आणि पुढील निवडणूक प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

November 14, 2026

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add