जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. भुसावळ प्रतिनिधी : शिंदी (ता. भुसावळ): किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या अनुपस्थितीमुळे शिंदी येथील गरोदर महिलेचा जीव धोक्यात आला. सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रविवारी दुपारी २ ते ३ वाजता शिंदी येथील महक अलताफशहा या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाईकांनी किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका चालक झाकिर नजीर दरवेशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने बाहेरगावी मुलगी बघायला गेल्याचे सांगून येणार नसल्याचे उत्तर दिले. नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलले, असा त्यांनी सांगितले की, चालक…
Author: Editorial Desk
भुसावळातील दुचाकी शोरुम्सची तात्काळ तपासणी; भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांच्या टू-व्हीलर (दुचाकी) शोरुम्समध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी तात्काळ तपासणीचे आदेश जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शोरुम्सवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, यामुळे भुसावळ तालुक्यातील विनापरवाना व नियमबाह्य सुरू असलेल्या दुचाकी शोरुम चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार भुसावळ शहरातील सर्व दुचाकी शोरुम्सची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत शोरुम्सकडे असलेली आवश्यक परवाने, अधिकृत नोंदणी, विक्री प्रक्रिया, वाहन नोंदणी संदर्भातील नियम,…
सीईओ मीनल करनवाल यांचे आदेश; मोकळ्या जागेवर होणार लोकहिताची नवी विकासकामे जळगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या परंतु सध्या वापरात नसलेल्या, अत्यंत जीर्ण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोकादायक ठरलेल्या इमारती व कार्यालये मोडीत काढण्यासाठी (निर्लेखित) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक जुन्या इमारतींचा प्रश्न निकाली लागणार आहे. सुरक्षिततेला प्राधान्य आणि संभाव्य अपघात टाळण्याचे उद्दिष्टजिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक कार्यालयीन इमारती अनेक वर्षांपासून रिकाम्या आहेत. दीर्घकाळ देखभाल न झाल्यामुळे या इमारतींची पडझड झाली असून त्या ‘अडगळीत’ पडल्या आहेत. काही ठिकाणी या इमारती सार्वजनिक…
दोन्ही पक्षांकडून नावांची घोषणा नाही ; जळगावकरांची उत्सुकता शिगेला ! जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्यापही आपली पत्ते उघड न केल्याने सस्पेन्स कायम आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी भाजपकडून प्रत्येकी सहा असे एकूण १२ अर्ज तर शिवसेनेकडून महापौरपदासाठी दोन आणि उपमहापौरपदासाठी दोन असे चार अर्ज घेण्यात आले.मात्र येत्या २ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उप महापौर पदासाठी कुणाची नावे समोर येतात याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता प्राप्त करून यश प्राप्त केले…
१६० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग; ‘आधी स्वतः शिस्त’चा दिला ठाम संदेश जळगाव प्रतिनिधी : शहरात सुरू असलेल्या *‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’*च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी भव्य दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा व सुरक्षित प्रवासाचे नियम पाळावेत, या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. “आधी स्वतः शिस्त, मग इतरांना धडा” या भूमिकेतून रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट परिधान करून नागरिकांसमोर आदर्श ठेवला. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलिस मुख्यालयातून या रॅलीला प्रारंभ…
अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या निधनानिमित्त अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहिली. दीपप्रज्वलनाच्या प्रकाशात संपूर्ण परिसर भावूक झाला होता. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आदर व कृतज्ञतेची भावना दिसून येत होती. स्व. अजित दादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या…
खोटी मालकी दाखवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात जळगाव : भूसंपादन विभाग, जळगाव यांच्या कडील भूसंपादीत जागेची मालक असल्याचे खोटे भासवून शासनाकडून तब्बल १६ लाख ९७ हजार ३२६ रुपयांचा मोबदला बँक खात्यात घेत शासनाची फसवणूक करणाऱ्या महिलेला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील (वय ५९, रा. ज्ञानेश्वर नगर, देवळाली पाथर्डी रोड, नाशिक) हिने मौजे नशिराबाद, तालुका जळगाव येथील गट क्रमांक २२०६ मधील प्लॉट क्रमांक ३ व ४ हे स्वतःचे असल्याचे भासवले. प्रत्यक्षात हे प्लॉट श्रीमती पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीचे आहेत.…
जळगावच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; जळगाव । नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत जळगावमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. यांनतर जळगाव महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असून दोन दिवसांपूर्वीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले. यात ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. मात्र अद्यापही महापौर पदाचा चेहरा जाहीर झाला नाहीय. यामुळे जळगावचा महापौर कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अशातच महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. असा असेल कार्यक्रमशासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या मंगळवार(दि २७) आणि बुधवारी(दि २८) महापौर व उपमहापौर पदाचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. मनपा आयुक्तांनी…
पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; बांधावर जाऊन केली पाहणी जळगाव । जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा…
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजनांचे मोठं विधान; जळगाव । अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? कोण उपमुख्यमंत्रिपदाची घेणार यांची चर्चा रंगली होती. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं. काय म्हणाले गिरीश महाजन?मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा…

