भुसावळ येथील दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या निर्घृण भुसावळ : साक्री ता. भुसावळ येथील दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना( शिंदे गट ) महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व याप्रसंगी सौ.नंदाताई निकम यांनी सदर हत्याकांडास जबाबदार असलेल्या आरोपींना लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यासाठी शासन दरबारी शक्य तितका पाठपुरावा करून पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संशयित हा अल्पवयीन असला तरी त्याने केलेले कृत्य हे खुना चे असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा म्हणजेच फाशी ची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली . या प्रसंगी शिवसेना माजी…
Author: Editorial Desk
एसीबीच्या सापळा कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल…
पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली जळगाव । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता. विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या…
हरभरा,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत नाहीये. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ऐन हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केळी पिकांसह रब्बी हंगामातील गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यातील हुडहुडी भरणारी थंडी जवळपास गायब झाली असून ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतारामुळे गारठा ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे.…
खासदार संजय राऊत यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. “अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली तेव्हा मनोमन प्रार्थना करत होतो की ही बातमी खोटी ठरावी आणि ते सुरक्षित असावेत. मात्र त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मोठा धक्का बसला,” असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण बेचव व अळणी होईल. दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा असा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.” महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा…
ब्रेकिंग न्यूज: राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रावर शोककळा ! बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळासह सर्वत्र मोठी शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीवर प्रचंड वेगाने आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सहा जणांचा मृत्यू प्राथमिक अहवालानुसार, या विमानात…
जळगाव महापौरपदी कुणाची वर्णी? ‘ओबीसी महिला’ आरक्षणामुळे राजकीय सारीपाट तापला; जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘ओबीसी महिला’ आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय राजकीय गणिते वेगाने बदलत असून, भाजपच्या गोटातून महापौरपदासाठी चार प्रबळ दावेदार मैदानात उतरल्याने ही लढत आता अधिक चुरशीची झाली आहे. दोन नव्हे, आता चार दावेदार! सुरुवातीला ही लढत केवळ दोन नावांभोवती मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या एन्ट्रीमुळे आता चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे: कविता सागर पाटील: पिंप्राळा या बालेकिल्ल्यातून २२ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर कार्यकर्ते सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या…
थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या जळगाव । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंर्तगत पात्र महिला दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून या योजनेचे पैसे थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये संक्रातीपूर्वी मिळाले. मात्र या योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यातच जळगावमध्ये लाडक्या बहिणींनी आक्रमक झाल्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आहे. लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या…
विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली जळगाव । भुसावळ तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळून आले. गावालगत असलेल्या विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून याप्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे. काय आहे घटना?भुसावळ तालुक्यातील साकरी येथील दोन्ही अल्पवयीन मुली जनता विद्यालयात इयत्ता 9 वीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतीतील विहिरीत…
अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींचे वाचणार प्राण : रस्ता सुरक्षेला मिळणार नवी दिशा जळगाव : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावे यासाठी सरकारने. उपाययोजना केल्या आहेत. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे, तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचविणाऱ्या मदतनिसाला ‘राहवीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यात केल्या ६१ दुरुस्त्यारस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, यामुळे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे. अपघात आणि मृतांची संख्या कमी करण्याचा प्रयत्नकॅशलेस…

