जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ मध्ये ग्राहक बनून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या सोन्यापासून बनवलेली सोन्याची लगड देखील हस्तगत केली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सुभाष चौकातील नयनतारा अँड सन्स (आर.सी. बाफना ज्वेलर्स) मध्ये एक अज्ञात इसम सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन २ लाख ४९ हजार अत्यंत शिताफीने चोरून नेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Author: Editorial Desk
वासुदेवाच्या प्रबोधनात्मक संगीताने दुमदुमले जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील अविभाज्य घटक असलेला ‘वासुदेव’. पारंपारिक वेशभूषा केलेल्या वासुदेवाने आपल्या प्रबोधनात्मक संगीताच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. सांगीतिक प्रबोधनाने वेधले लक्ष : “वासुदेव आला हो वासुदेव आला…” या लोकप्रिय आणि प्रबोधनात्मक संगीताच्या सुरावर वासुदेवाने मतदानाविषयी जनजागृती केली. केवळ भाषणे किंवा फलकबाजी न करता, लोककलेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश थेट लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी वासुदेवाने आपल्या सादरीकरणातून “प्रत्येक मत मौल्यवान आहे” आणि “लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे”,…
ई-केवायसीतील चुकांमुळे लाभ थांबला; अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू होणार जळगाव प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेदहा लाखांहून अधिक महिला पात्र असताना डिसेंबर महिन्यात तब्बल १ लाख ८ हजार ९६ महिलांना मासिक हप्ता मिळाला नसल्याचे समोर आले आहे. अचानक लाभ थांबल्याने जिल्हाभरात महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, या लाभार्थ्यांचा हप्ता थांबण्यामागे ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र, नंतर शासनाने उत्पन्न मर्यादा, घरात चारचाकी वाहन असणे आदी अटी लागू केल्याने काही महिलांचे नाव…
पोलीस कवायात मैदान येथे २६ रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण जळगाव प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. २६ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, गुलाबराव पाटील, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहणानंतर त्याच ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. जळगाव शहरातील जास्तीत जास्त…
जळगावकरांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे आणखी एक नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031/ UP-11032) ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या गाडीला जळगाव-भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ट्रेन क्रमांक 11031 पनवेल जंक्शन-अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11:50 मिनिटांनी पनवेल जंक्शनवरून सुटेल आणि बुधवारी दुपारी 01:50 मिनिटांनी वाजता अलीपुरद्वार जंक्शन स्टेशनवर पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 04:45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून…
‘सायन्स टेक@वर्क’ कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट जळगाव : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी केला पाहिजे, ते प्रत्यक्ष जीवनात उतरविले तर आर्थिकदृष्ट्या सामाजिक परिवर्तन घडेल, यासाठी जैन इरिगेशनच्या जैन हिल्स येथील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या ‘सायन्स टेक@वर्क’ या हायटेक शेतीच्या नव्या हुंकार कृषिमहोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन करीत…
चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत जळगाव । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शहराच्या विविध भागांतून महागडी बुलेटसह एकूण चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ, रामानंदनगर, एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ओंकार नगरातील रहिवासी उमेश ललित सूर्यवंशी हे २० जानेवारी रोजी चोपडा मार्केट परिसरात कामानिमित्त गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच-१९, डीए-५०१७) मार्केट परिसरात उभी केली होती; मात्र अवघ्या दोन तासांत अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी घटना नागेश्वर कॉलनी परिसरात घडली आहे.…
निंभोरा गाव सेवा समितीचा डीआरएम यांना निवेदनातून ईशारा : भुसावळ प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील निंभोरा येथे पठाणकोट एक्सप्रेसला पूर्ववत थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष चालवले असल्याने निंभोरा व परिसर गाव सेवा समिती अत्यंत छुप्या पद्धतीने व गनिमी काव्याने तारीख न सांगता अचानक रेल रोको व जेलभरो आंदोलन करणार असल्याचा ईशारा समितीचे प्रमुख संयोजक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेल्या पठाणकोटला निंभोरा रेल्वे स्टेशनवर असलेला थांबा कोरोनानंतर अचानक रद्द झाल्याने प्रभावित झालेल्या प्रवासी, व्यापारी व सर्वच घटकांनी एकत्र येऊन टप्प्याटप्याने आक्रोश आंदोलन चालवले असून गेल्या ३…
करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत जळगाव प्रतिनिधी : दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत यांच्या पिंप्राळा येथील गणपती नगरात हळदी कुंकू चें आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत व जिल्हा सचिव मीनाताई राजपूत यांची उपस्थिती लाभली या वेळी सारिकाताई यांनी आपल्या भाषणातून महिला संघटन वर भर देताना सांगितले कि महिला संघटन काळाची गरज आहे. महिलांनी स्व संरक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यावी . स्वतः साठी वेळ काढावा असे मान्यवरांना सांगितले . आपल्या राजपूत समाजातील महिला बाहेर जो पर्यंत येणार नाही तो…
सरपंचाना मोठा धक्का बसण्याची शक्यता….! राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारावर लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी ग्रामपंचायत निवडणुका वेळेवर होण्याची शक्यता कमी असल्यामुळे शासन ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा विचार करत आहे. यामुळे सध्या सेवा करीत असलेले सरपंच आणि सभापती यांना प्रचंड धक्का बसणार आहे. सरकारी वर्तुळांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, निवडणूक प्रक्रियेतील तंत्रनिक, प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींमुळे सरकार हा निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे आहे. निर्णयाला अधिकृत स्वरूप येण्याआधीच स्थानिक पातळीवरील नेतृत्वात चिंता जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतींच्या कारभाराचा अधिकृत अधिकार हटून प्रशासकीय अधिकारी जबाबदार ठेवले गेले, तर निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावर दीर्घकालासाठी जाणारा असल्याचे तज्ज्ञांचे…

