Author: Nilesh Ajmera

भाजप उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा नवा अंतर्गत संघर्ष उभा ठाकल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये तब्बल पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी लावली असून, अजूनही अनेक जण रांगेत असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांत उद्धव सेनेसह इतर पक्षांतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, सुनील महाजन आणि प्रशांत नाईक या माजी नगरसेवकांच्या आगमनामुळे पक्षाची ताकद वाढली असली, तरी मूळ व वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावेळच्या…

Read More

संजय सोनवणे निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारा ट्रॅक्टर आणि एका मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या दुर्दैवी मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोनवणे हे जळगाव येथील मालधक्क्यावर सिमेंटच्या गोण्या भरण्याचे व उतरवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसह सिमेंट भरलेला ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 6078) घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. तिथे सिमेंट खाली करून जळगाव शहराच्या दिशेने परतत असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव…

Read More

मनपा यंत्रणा सज्ज ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुधारित नियुक्त्या जाहीर जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे सुधारित आदेश जाहीर केले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी, या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या नियुक्ती प्रक्रियेत तहसीलदार उमा ढेकळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या स्थानिक रहिवासी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने, संभाव्य हितसंबंध टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून या पदावरून वगळण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत प्रशासनाने…

Read More