Author: Editorial Desk

पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव । मध्य पूर्वेतील इराण-इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाची झळ भारताला असत असल्याचं दिसत असून आजपासून भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्याने सर्वसामान्य नागरीक धास्तावले आहेत. इराण-इस्त्रायलचे युद्धामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळे इंधन,गॅसची आयात होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.अशातच आता तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल, असं तेल कंपन्यांनी सांगितले आहे.युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये…

Read More

उन्मेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार…

Read More

भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. जळगाव । मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा आता भारतावरही परिणाम होत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ केली आहे. नवे दर आज म्हणजेच ७ मार्चपासून लागू होतील. जळगावला ८५८.५० रुपयांत मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर आता ९१८.५० रुपयांना मिळेल. यामुळे पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये होईल. तर, व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,७६४ रुपयांवरून १८८३ रुपये होईल.घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत शेवटच्या वेळी ८ एप्रिल २०२५…

Read More

जळगाव जिल्ह्यात तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान 2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार केला जाणार असून या जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महा-रेशीम अभियान राबविले असून त्याअंतर्गत तुती लागवड वाढविणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच रेशीम उत्पादन…

Read More

ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे. जळगाव प्रतिनिधी । शहराजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नवीन वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांना तीव्र उन्हात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप मनसेने केला असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या ट्रॅकवर दररोज जिल्हाभरातून शेकडो वाहन चालक, वाहनमालक आणि नागरिक विविध कामांसाठी येत असतात. वाहन फिटनेस तपासणी तसेच कायमस्वरूपी…

Read More

उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीत आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीनंतर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्मशानभूमीत शेड, सुरक्षा रक्षक कक्ष (वॉचमन रूम) तसेच अन्य मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. पिंप्राळा उपनगर तसेच परिसरातील अनेक वसाहती आणि कॉलनींसाठी अंत्यसंस्कारासाठी पिंप्राळा स्मशानभूमी ही सर्वात जवळची आणि सोयीची जागा मानली जाते. मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी देखभालीचा अभाव असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास…

Read More

श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरासमोरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई करत ते हटवले. जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉवर चौक परिसरात असलेल्या श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरासमोरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई करत ते हटवले. महापौर दीपमाला काळे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील रस्ता मोकळा झाला असून मंदिर बांधकामासाठी होणारा अडथळा दूर झाला आहे. टॉवर चौक परिसरातील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिराचे नूतनीकरण आणि बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही व्यक्तींनी अनधिकृतपणे मोठ्या लोखंडी पेट्या आणि इतर साहित्य ठेवून अतिक्रमण केले…

Read More

ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली देशभर चार टप्प्यांत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात आली.या निवेदन आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य घनश्याम चौधरी यांनी केले. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केंद्र शासनाच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. निवेदनात नमूद करण्यात आले की, केंद्र शासनाने ओबीसींची…

Read More

भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…

Read More

देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले एरंडोल येथील ॲड. ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत B.Tech पदवी प्राप्त केली आहे. त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. अत्यंत कमी वयात UPSC परीक्षा उत्तीर्ण होत त्याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले आहे. आकाश आणि त्याचा…

Read More