Author: Editorial Desk

उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. पिंपळगाव हरे : उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. दरम्यान अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी स्वयंपाक बनवत असतानांना एलपीजी गॅस सिलेंडरची नळी लिक होऊन अचानक पेट घेणार तेवढ्यात अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगत आपल्या जीवाची परवा न करता पेट घेणाऱ्या गॅस गळतीला विझवून शाळेतील 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. या त्यांच्या हिमतीची दखल घेत कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी विजयकुमार ठाकुरवाड, कासोदा पोलीस स्टेशन एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्या…

Read More

शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले. यावल प्रतिनिधी : शहरातील व परिसरातील मोकाट फिरणारे गुरे आणि सांड यांचा बंदोबस्त ८ दिवसात न झाल्यास शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे, मोकाट गुरांमध्ये सांड सुद्धा आहेत रस्त्याने बैलगाडी,मोटरसायकलने जाणाऱ्या- येणाऱ्यांच्या अंगावर हे सांड मागे सुटतात व बैलगाडीला बांधलेल्या बैलांना मारतात जखमी करतात सदरचे सांड हे बैलगाडीला धडक देऊन माणसांना सुद्धा जखमी करून आजूबाजूने येणाऱ्या…

Read More

जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला. जळगांव प्रतिनिधी : खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघचे राज्याध्यक्ष श्री राजेंद्र निकम, महासचिव श्री विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगर सचिव श्री शेखर उंडे, सदस्य श्री अमोल शिंदे, नाशिक टिडीएफ संघटक श्री दिनेश देवरे, राज्य कार्यकारणी सदस्य श्री हेमंत कुमार पाटील,श्री देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री अजित चौधरी, जिल्हा सचिव श्री जीवन महाजन जिल्हाकार्याध्यक्ष श्री राकेश पाटील उपस्थित होते. संस्थेचे सभासद पाल्य यांनी नेत्र दीपक यश मिळवले त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.…

Read More

वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भुसावळ प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना, “माझे माहेर तळवेल असले तरी माझे संपूर्ण शिक्षण तळवेल गावात झाले. त्या शिक्षणाच्या बळावरच मी वरणगाव शहरात समाजकार्य आणि राजकारणात सक्रिय झाले,” असे त्यांनी सांगितले. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महसूल उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे ,विभागाच्या मंडळ अधिकारी रंजना तायडे ,तलाठी रेणूका पाटील, तळवेल सरपंच विद्या ताई भारसके, अम्रपाली गवई, नगरसेविका…

Read More

तहसील कार्यालयासमोर आणून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मुक्ताईनगर प्रतिनिधी : नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवैध उत्खनन करतअसलेले चार डंपर व एक मोठे पोकलेन पकडून ते मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आणून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र तहसीलदार गिरीश वखरे यांनी सदरील वाहनांची चौकशी न करता, मुरूम उत्खननाचे परमीट न तपासता सुट्टीच्या दिवशी शनिवारी सोडून देण्याचे आदेश दिले, ज्यामुळे संबंधित कंत्राटदार बीएन अग्रवाल कंपनीने त्यांचे चार डंपर वर पोकलेन घेऊन निघून गेल्याचा आरोप संबंधित डंपर पकडून आणणाऱ्या नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहराततील सुज्ञ नागरिकांनी महसूल प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला असून कंत्राटदारावर प्रशासन मेहेरबान आहे का ? असा प्रश्न आता नागरिक…

Read More

मृत्यू अपघात दाखवून ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; चार पोलिसांसह आठ जण अटकेत चाळीसगाव प्रतिनिधी – नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून सुमारे ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह खोटा मृत्यू दाखला देणारे वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणारे चार पोलिस कर्मचारी अशा एकूण आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून चाळीसगाव परिसरात विमा फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर राजेंद्र शालिंदर जाधव (रा. मालेगाव) यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. जाधव…

Read More

वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी भुसावळ प्रतिनिधी : साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत असून वेगवान वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावजवळील नदीकाठी पाण्याच्या शोधात आलेल्या नर निलगायला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निलगाय दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरातील गोसेवक बल्लू धायडे आणि रोहित महाले यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला याबाबत कळविले. या घटनेनंतर प्राणीमित्रांनी शासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. गोसेवक रोहित महाले…

Read More

ठेकेदाराची मनमानी अन् अभियंत्यांचा आदेश धाब्यावर? जळगाव: जळगाव जिल्हा प्रशासनाकडून एकीकडे वृक्ष लागवडीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच वृक्षांची पद्धतशीरपणे ‘नासाडी’ करण्याचा घाट घातला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील ऐतिहासिक ‘हेरिटेज’ इमारतीच्या अवतीभवती असलेल्या ३० ते ४० वर्षे जुन्या वृक्षांच्या मुळांभोवती चक्क सिमेंट काँक्रीटचे थर टाकले जात असून, यामुळे भविष्यात हे वृक्ष मोडून पडून मोठी जीवित वा वित्तहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. झाडे जगवण्यासाठी नाही, तर मारण्यासाठीच खटाटोप? जिल्हाधिकारी कार्यालयातील हेरिटेज इमारतीचे सौंदर्य वाढवणारी ही जुनी झाडे आता प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत आहेत. नियमानुसार झाडाच्या बुंध्याभोवती ठराविक जागा मोकळी ठेवणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने या झाडांच्या…

Read More

याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून कुटुंबातील चौघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अन्वरउल्ला शेख रूउल्ला वय ४५ रा. मनियार वाडा, नशिराबाद हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २ मार्च रोजी रात्री ८ वाजता गावात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेख अन्वरउल्ला व त्यांच्या पत्नी, मुलगा आणि पुतण्या यांना शरीनबी अफसर खान, अफसर खॉन शेर खॉन दोन्ही…

Read More

महाराष्ट्र शासनाने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. जळगांव : महाराष्ट्र शासनाने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेषतः अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासोबतच सिंचन, जलसंपदा, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासासाठी…

Read More