Author: Editorial Desk

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. जळगाव प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार महत्त्वाच्या संचालकांनी रविवारी नाशिक येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपचे आता स्पष्ट बहुमत झाले आहे. या चार संचालकांच्या प्रवेशामुळे बाजार समितीमधील भाजपच्या संचालकांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील, तथा (लकी टेलर) माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी बाजार समितीचे विद्यमान सभापती सुनील…

Read More

एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली. जळगाव प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जळगावात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेरा युवा भारत केंद्र जळगाव तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ASMITA Khelo India’ उपक्रमांतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या. एम. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य प. वि. माध्यमिक शाळेच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार स्मिता…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपालिकेत विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांसह महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील कष्टकरी आणि कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी खर्चून अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी यावेळी केली. भुसावळ नगरपरिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील उपेक्षित आणि कष्टकरी अशा सुमारे तीनशे महिलांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक महिलांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानित महिलांमध्ये जयश्री काळवीट, चारूलता भालेराव, ॲड. भंडारी यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना…

Read More

विकासकामे रखडली; नागरिकांचा आमदार सुरेश भोळेंना ‘अंत्ययात्रा आंदोलन’चा अल्टिमेटम जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विविध मूलभूत समस्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी आमदार सुरेश दामु भोळे यांना निवेदन देत निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली असून, 23 मार्च 2026 पर्यंत समस्यांचे निराकरण न झाल्यास अनोख्या पद्धतीने ‘अंत्ययात्रा आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात आमदार सुरेश दामु भोळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रामेश्वर कॉलनी परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही या समस्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक…

Read More

बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये नदीम खान नसीम खान (वय 27) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय 16) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात काही मुले अडकल्याचे लक्षात येताच नदीम खान आणि काफिया पिंजारी यांनी धाडसाने नदीत उडी घेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिहान आसिफ शेख (वय 8) आणि शगुफ्ता जब्बार शेख (वय 35) यांना नदीम खान यांनी सुरक्षित बाहेर काढले. मात्र काफिया पिंजारी याला…

Read More

जिल्ह्यांमध्ये सूर्य तापला उष्णेतेची लाट, जळगावसाठीही महत्वाचा इशारा जळगाव । मार्च महिन्याची सुरुवात होताच जळगावसह राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्याने उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तापमान वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असून ते ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३८.५ इतके होते. तर किमान तापमान १७ अंशापर्यंत होते. दरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी…

Read More

मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई जळगाव । मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत एक गावठी…

Read More

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनाली महिलांचे व्हिडीओ ३० सेकंदाचे पाठवायची अशी माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे. उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवालला पोलिसांनी अटक केली होती. या संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहे. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात एक एक करत अनेक महिलांना अटक…

Read More

वयाच्या ५८ व्या वर्षीही नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण भारतीय संस्कृतीत नद्यांना देवता मानतात. नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची आपली पुरातन परंपरा आहे. यासाठी असंख्य प्रथा, चालीरीती, रितीरिवाज आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण व पृथ्वीतलावरील एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदापरिक्रमा होय. याच परंपरेला मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील या यांनी नर्मदा मैय्याची पाचवी परिक्रमा दि. ११ जानेवारी रोजी शुभमुहूर्तावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्यप्रदेश येथून संकल्प करून ४८ दिवस यात्रेत पायी चालत माता नर्मदेची पायी परिक्रमा दि. १ मार्च २०२६ रोजी पूर्ण केली. अत्यंत खडतर समजली जाणारी पायी नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड राज्यांतून जवळपास बाविस जिल्ह्यामधून साधारणत साडेतीन हजार किमीचा…

Read More

सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. जळगाव – मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून त्याची जळगावात विक्री करणाऱ्यांचा जिल्हापेठ पोलीसांनी पर्दाफाश केला. सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. गावठी पिस्तुलची विक्री करणारा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. सात पैकी तीन संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तर उर्वरीत चौघांनी केवळ दहशत माजविण्यासाठी त्यांनी गावठी कट्टे खरेदी केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे (वय २७) हा गावठी…

Read More