आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती. आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प अनेक बाबींनी खास आहे. यात महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. तर राज्यात नवीन काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. यासह विविध घोषणा या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, या अर्थसंकल्पानुसार,…
Author: Editorial Desk
जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जळगाव । जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत महापालिकेने मर्यादित कालावधीसाठी ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ५ ते १९ मार्च या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करून घेण्याची संधी मिळणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या योजनेमुळे नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरताना दंडाची रक्कम भरण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी केवळ मूळ कर भरून आपली थकबाकी पूर्णपणे निकाली काढता येणार आहे. या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास…
नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची उपविभागीय अधिकारी (वरोरा) संदीप भस्के यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित घाटांवरील उत्खननाबाबत माहिती घेत त्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या वेळी घाट परिसरातील परिस्थिती, उत्खननाची पद्धत, नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदार व कामगारांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर रस्त्यांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात…
एकात्मतेचे दर्शन : पदयात्रेत पायी चालणे एक प्रकारचे तप धानोरा ता. चोपडा ; येथून प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. धानोरा येथून सुरू झालेली ही पदयात्रा यंदा 17 व्या वर्षात प्रवेश करत असून 5 मार्च ते 19 मार्च या कालावधीत चालणार आहे.पदयात्रेचा शुभारंभ परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन व धर्मध्वज पूजन करून करण्यात आला. परमात्म्याकडे स्वतः पायी चालत जाणे ही श्रद्धेची भावना मनात ठेवून धानोरा तसेच परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी या पदयात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्व समाजातील स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी तसेच अबालवृद्ध अशा सुमारे 60 भाविकांचा या…
कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी सुदृढ कृषी उत्पन्न बाजार समिती होय. “दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये” ही म्हण खरी आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी सुदृढ कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथे आहे ती उत्पन्नाची साधने भरपूर असल्याने नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्याची गरज नव्हती. परंतु ‘शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामातून कमिशन खाता येते,’ या धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यापाऱ्यांची जागा कमी करून त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा घाट घालण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ठराव करण्यात आला. पराग कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर देण्यात आले. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 कोटी 76 लाख रुपये पराग कन्स्ट्रक्शन कडून…
अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ – भुसावळजवळील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी राज्यभरातून अंदाजे आठ ते दहा लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने भुसावळ शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी (4 मार्च) प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शिवपुराण कथेच्या अनुषंगाने आज किंवा उद्यापासून शहरातील…
उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत यावल प्रतिनिधी : जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत देखभाल दुरुस्ती कामांची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षापासून करण्यात आली आहे.कार्यक्षेत्रातील अनेक उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून तसेच तक्रारदारांमध्ये आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे की २८ मे २०२५ रोजी तसेच २२ जानेवारी २०२६ रोजी तक्रार अर्ज दिले आहेत त्यात नमूद करण्यात आले आहे की तापी…
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ येथील एका विवाह सोहळ्यातून नववधूचे दागिने असलेली पर्स लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये फिर्यादी उज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. या वेळी नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान सोफ्यावर ठेवलेली ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड, मुक्ताईनगर रस्ता तसेच गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव ता भुसावळ शहरात अनेक दिवसा पासून वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर अखेर नगरपरिषद प्रशासनाने मोठी कारवाई करत आज (दि.५, गुरुवार) तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड, मुक्ताईनगर रस्ता तसेच गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईदरम्यान अनेक ठेले, टपऱ्या, शेड, फलक (बोर्ड) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. वरणगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या आणि रस्त्यावरच…
सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे. जळगाव शहरापासून नजीक असलेल्या तरसोद फाट्याजवळ असलेल्या ‘हॉटेल सावन’ला काल सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरसोद फाट्याजवळील हॉटेल सावनमध्ये सध्या नूतनीकरणाचे (पीओपी) काम सुरू होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आगीने रौद्र रूप धारण केले. हॉटेलचे छत पूर्णपणे ‘पीओपी’चे असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण हॉटेलला वेढले. धुराचे लोट लांबूनच दिसत असल्याने परिसरात…

