Author: Editorial Desk

डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी ! होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले. पुण्यातील कोरेगाव पार्क–मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे आयोजित होळी सेलिब्रेशन कार्यक्रमादरम्यान लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त रॉयल फॉर्म येथे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी जमले होते. डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत सर्वजण नाचत असताना अचानक स्टेजजवळ उभारण्यात आलेला लाईटचा लोखंडी गर्डर कोसळला. हा गर्डर थेट नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. अपघातात सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ४…

Read More

सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावल प्रतिनिधी : शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या मैदानावर रविवारी मोठ्या उत्साहात स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचा अंतिम सामना यावल शहरातील केसरीनंदन क्रिकेट टीम व राजमुद्रा क्रिकेट टीम यांच्यात रंगला.राजमुद्रा क्रिकेट संघाने हा अंतिम सामना २७ धावांनी जिंकला.हा अंतिम सामना रविवारी संध्याकाळ पर्यंत रंगला होता.सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावल शहरातील बस स्थानकाजवळी मैदानावर स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील संपूर्ण सामने हे चुरशीचे ठरले होते तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यावल शहरातील राजमुद्रा क्रिकेट टीम व केसरी नंदन क्रिकेट टीम हे दाखल झाले…

Read More

पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. जळगाव – वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७, याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्यचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी संशयित दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी गेला होता. त्याने पीडित मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेला तिच्यासह तिच्या वडीलांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.…

Read More

प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते. भुसावळ प्रतिनिधी भुसावळ नगरपरिषद च्या सभे मध्ये मा. सभापती शोभा ताई इंगळे यांनी पोलीस वसाहत मधील अपुऱ्या सुविधा व पोलीस बांधव व त्यांचा परिवार सहन करत असलेल्या यातना यांना वाचा फोडली व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते. पोलीस बंधु सर्व नागरिकांचे सण उत्सव इमानदारीने बंदोबस्त राखून स्वतः परिवारा पासून लांब राहून नागरिकांचे उत्सव सुखरूप पणे पार पडतात नगरपालिकेचा कर भारतात मग त्यांना नागरी सुविधा का नकोएक लाईट सुद्धा चालू नाही आहे ही शोकांतिका…

Read More

शिवभक्तांनी रविवारच्या रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, भुसावळ प्रतिनिधी : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील बस स्थानकावर शिवभक्तांनी रविवारच्या रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याजवळ ठिया मारून विरोध करत पोलिसांना हटविण्यापासून रोखले, तर मंत्री . संजय सावकारे यांच्या सूचनेने १-२ महिन्यात परवानगी घेऊन नवीन पंचधातूचा पुतळा बसवण्याचे आश्वासन मिळाले. घटनेची माहिती अशी की कुऱ्हे (पानाचे) हे भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मराठा बहुल गाव असून, लोकसंख्येनुसार तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकावर शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी आणि चबुतऱ्याचे बांधकाम झाले असले तरी दुर्लक्ष होत होते. रविवारी रात्री शिवभक्तांनी अचानक पुतळा स्थापन…

Read More

एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली. रावेर प्रतिनिधी : पाल ता रावेर सातपुड्याच्या कुशीत वसलेले रावेर तालुक्यातील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धामात सालाबादाप्रमाणे यंदाही दि 2 मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा होळी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली. या महोत्सवात सकाळी अकरा वाजेला अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे पचरंगी ध्वजचे अनावरण…

Read More

आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती MahaLive News | जळगाव : जळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या भिकामचंद जैन नगर व वाघुळदे नगर परिसरात रस्ता कॉंक्रेतीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, विकासाच्या दिशेने एक ठोस व महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.या विकासकामासाठी सागर जिजाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर कामास मंजुरी मिळाली, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाचे उद्घाटन जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उद्घाटनप्रसंगी नवनियुक्त महापौर दिपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आलेले नगरसेवक कविता…

Read More

सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम जळगाव । धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात. नाल्यातील गाळ हा काळ्या आईचं सोनं असून तो शेतात गेला तर जमिनीची सुपीकता वाढते. या कामासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी असून सर्वांनी…

Read More

युद्धाचे परिणाम : महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अडकून इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने पुणे, विदर्भ आणि शहापूरमधील प्रवाशांची चिंता वाढली असून भारत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील नागरिक परदेशात अडकले आहेत. पुणे, विदर्भ, शहापूर अशा अनेक भागांतील नागरिक अडकले असून स्वदेशी परतण्यासाठी भारताकडे मदतीची मागणी…

Read More

चोपडा तालुक्यातील प्रेमीने स्वतःलाही संपविले : अकुलखेडा गावातील घटना चोपडा तालुक्यातील अकुल खेडे येथे प्रेम प्रकरणातून प्रियेसीवर गावठी पिस्तूलातून गोळी झाडून हत्या करून स्वतःला गोळी मारून जीवनयात्रा संपवल्याची थरारक घटना घडली. शाळेतून परत आलेल्या मुलीला दोघं ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड आक्रोश करीत बाहेर पडल्यानंतर घटनेची माहिती समोर आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर नामक व्यक्ती रक्तबंबाड अवस्थेत त्याच्या घरात आढळून आले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास जगदीश काशिनाथ पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोघे मृतदेह पाहून…

Read More