नागरिकांना मोठा दिलासा जळगाव : शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. महापालिका हद्दीतील, महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास, संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाइकांना **जळगाव महानगरपालिका**कडून आर्थिक मोबदला (नुकसानभरपाई) दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक पुराव्यांसह माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी अर्ज महापालिकेच्या नवव्या मजल्यावर शहर अभियंता कार्यालयात, सर्व आवश्यक पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे रस्ते देखभालीबाबत महापालिकेची जबाबदारी अधिक वाढली असून, अपघातातील जखमी नागरिक तसेच मृतांच्या कुटुंबीयांना कायदेशीर आधार मिळाला…
Author: Nilesh Ajmera
या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले अमळनेर – केवळ “माझ्याकडे का पाहिले?” या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने बाप-लेकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे सोमवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,१९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी विजय बापू अहिरे (वय-२३) हे आपल्या घराच्या गच्चीवर उभे होते. यावेळी आरोपी विनायक आनंदा अहिरे याने विजयने त्याच्याकडे का पाहिले, या कारणावरून वाद उकरून…
डीवायएसपींच्या पथकाची कारवाई जळगाव । जळगावमध्ये आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी यांच्या पथकाने जळगावच्या पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. तर संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंप्राळा भागात एका ठिकाणी छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यावरुन बारीवाडालगत बैरागी नामक महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. त्याला खात्री करून मोबाइलवर मिस कॉल देण्यास…
उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे नेत्यांपुढे लोटांगण! जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नसल्या, तरी जिल्ह्याच्या राजकारणात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भातील मर्यादांवर दि. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणूक अधिसूचनेआधीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराची कार्यक्षमता, कामाचा अनुभव किंवा जनसंपर्कापेक्षा ‘जातीय समीकरण’ अधिक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच विविध पक्षांतील कार्यकर्ते आपापल्या जातीच्या उमेदवारासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा ही पक्षांतर्गत बैठकींपेक्षा चहाच्या…
खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ ; गृहिणींच्या बजेटला फटका जळगाव । घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. पामतेल १३२ वरून १३७, सूर्यफूल तेल १६० वरून १७२ रुपये प्रतिकिलो झाले आहे. तीळ तेल २६० रुपयांवर स्थिर आहे. साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. मात्र मागच्या काही दिवसात खाद्यतेलात वाढ झाली. काय आहे दरवाढीचे कारण?अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत…
जळगाव महापौरपदासाठी भाजप निष्ठावंतांची चर्चा महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. 29 पैकी 17 महानगरपालिकामध्ये भाजपला यश मिळाले असून जळगाव महानगरपालिकेत भाजप आणि महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. 75 नगरसेवकांपैकी 69 जागा जिंकून महायुती आघाडीवर असून त्यात 46 पैकी 46 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष आहे; त्यापाठोपाठ 22 पैकी 22 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 5 पैकी अवघ्या एका जागेवर विजय प्राप्त करता आला. पाच उबाठाचे आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर हा महायुतीचाच होणार असला तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप महापौर पदाचा दावेदार आहे. भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नगरसेवक महापौरपदाच्या…
दारूसाठी पैसे नाकारल्याने वृद्धावर शस्त्राने हल्ला; गुन्हा दाखल ! जळगाव – शहरातील संत चोखामेळा बोर्डिंग जवळील पेट्रोल पंपासमोर एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिनेश काशीनाथ अहिरे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त जात असताना, आरोपी शेखर मराठे (रा. कासमवाडी, जळगाव) याने त्यांना सार्वजनिक रस्त्यावर अडवले. आरोपीने अहिरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र,…
३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ जप्त ! भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाला यश आले आहे. १८ जानेवारी रोजी प्रशासनाने टाकलेल्या धाड सत्रात तब्बल ३० हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टैंकर जप्त करण्यात आला असून, एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांचे धाबे दणाणले आहेत. नेमके प्रकरण काय ?भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’…
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे प्रवाशांचे वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला असून दोन मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे या धावणार आहेत. विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणजे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता., भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय हा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा…
महिनाभर भाविकांनाची रेलचेल : नवस फेडण्यासाठी होणार गर्दी यावल : तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान यात्रोत्सव 19 जानेवारी सोमवारपासून सुरु झाली आहे. माघ शुद्ध महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानंतर शनिवार दि. 24 रोजी, सोमवार दि. 26 रोजी, शनिवार दि. 31 असे चार वार असून 1 फेबुवारीला पौणिमेला यात्रेचा समारोप होईल. अट्रावल- भालोद रस्त्यावर अनेक वर्षापासून जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना -दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्चित करावी लागते. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली…

