जळगाव शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगाव । जळगाव शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची मागणी वाढली असून याच पार्श्वभूमीवर शहरात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रभागांमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.जळगाव शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अनेक प्रभागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले. बहुतांश प्रभागांत नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, नागरिक सध्याच्या दोन दिवसाआड पाणी पुरवठ्यातील अंतर कमी करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे ज्या भागात…
Author: Editorial Desk
महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. जळगाव । तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅज्युअल रजेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या बदलांमुळे आता कर्मचाऱ्यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत सहज जोडता येणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॅज्युअल रजेच्या आधी (प्रिफिक्स), नंतर (सफिक्स) किंवा रजेच्या कालावधीत येणारे रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्या जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.यापूर्वी 2 मार्च 1981 रोजी देण्यात आलेली ही सवलत तात्पुरत्या स्वरूपात होती; मात्र…
वाड्या-वस्त्यांवरील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळी गरवी कांद्याची लागवड करतात. पुरंदर तालुक्यातील वीर, परिंचे, माहूर, मांढर, हरगुडे, यादववाडी, पांगारे, हरणी, लपतळवाडी, तोंडल, तसेच विविध वाड्या-वस्त्यांवरील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळी गरवी कांद्याची लागवड करतात. पुरंदर तालुक्यातील या गावांना कांद्याचे आगार म्हटले जाते. या बहुतांशी गावांमध्ये मोठे बागायतदार तसेच छोटे शेतकरी हे हळवे आणि गरी कांद्याची लागवड करत असतात व त्यातून त्यांना चार पैसे अधिकचे मिळतात. परंतु, या वर्षी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली होती. बाजारभाव पडल्यामुळे ग््रााहकांचा फायदा होणार असला, तरी शेतकरी…
महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्यासारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या…
६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी जळगाव : बऱ्हाणपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना मोठे यश आले आहे. रावेर गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करत ७ संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ‘हसन फावड्या’ पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे. नेमकी घटना काय? बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना वसुलीसाठी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरात पाठवले होते. वसुली आटोपून रात्री ९ वाजेच्या…
97 लक्ष रकमेच्या मुळ अंदाजपत्रकास बुधवार 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत सादर करण्यात आले. जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे, सन 2025-26 चे सुधारीत 46 कोटी 93 लक्ष व सन 2026-27 चे 50 कोटी 97 लक्ष रकमेच्या मुळ अंदाजपत्रकास बुधवार 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत सादर करण्यात आले. त्यास ठराव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवार 25 फेब्रुवारी रोजी शाहू महाराज सभागृहात 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा…
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग निवडला. तिच्यावर वेश्या व्यवसाय चालविण्याची वेळ आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. तसेच हा रॅकेट उधळून लावला. या प्रकरणानंतर मुंबईसह सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमधून, हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. तसेच दोन…
दगडफेक, वाहनांची तोडफोड : बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटात तुफान हाणामारी दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका अंतर्गत अंभई गावात काल मध्यरात्री दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बकऱ्यांच्या व्यवहारातून वाद उफाळल्याने दोन गटात मारामारी झाली असून या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करून १५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बकऱ्यांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद हळूहळू चिघळला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी व दगडफेक झाली. या वादाला पुढे राजकीय स्वरूपही प्राप्त झाल्याचे सांगितले…
दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. ही घटना शहरातील मोहननगर परिसरातून सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३, रा. देवेंद्र नगर) यांची एक तोळ्याची सोन्याची चैन व दोन भाराची चांदीची चैन लांबविली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरून एका महिलेचीही सोनपोत लांबविली, मात्र या प्रकरणी महिलेने तक्रार दिली नसल्याने याप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवेंद्र नगरात राहणाऱ्या सीमा सूर्यवंशी या दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून एका…
जळगाव मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगाव | गेल्या काही दिवसापासून जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी मनपाचे सूत्र हाती घेतल्यानंतर जळगाव शहराच्या हद्दीत असलेल्या छोट्या अतिक्रमण धारकांवर मोठी कारवाई सुरू झाली आहे. मात्र शहरातील अनेक परिसरात रुग्णालय चालकांनी मोठे अतिक्रमण केले आहे यावर देखील कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करू लागले आहे. जळगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौरपदी दीपमाला काळे व उपमहापौपदी मनोज चौधरी यांचे वर्णी लागली आहे त्यानंतर जळगाव महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग मोठ्या हिमतीने कामाला लागला असून अनेक ठिकाणी असलेले छोट्या-मोठ्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा पडत आहे. मात्र शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या अनेक रुग्णालयाच्या बाहेर अतिक्रमण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुचाकी…

