Author: Editorial Desk

वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली जळगाव | वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू अक्षया सुनील चव्हाण (२३) आणि नवरा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकल्याने झाला. घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गत रविवारी मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात…

Read More

महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला. जळगाव | जपान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला. या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी खडसे यांनी खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील आशिष जगताप…

Read More

वरणगाव शहरातील समस्यांकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष .मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्या सह सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामार्गावरील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास त्वरित दूर न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे NHAI जळगाव कार्यालयाला दिला आहे. दिलेल्या निवेदनात समाधान महाजन आणि पदाधिकाऱ्यांनी वरणगाव परिसरातील पाच मुख्य मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मागण्या पुढील प्रमाणे आहेत. वरणगाव हे ५० हजार लोकसंख्येचे…

Read More

जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय लेवा पाटील संघाच्यावतीने लेवा पाटीदार समाजाच्या रविवार, २२ फेब्रुवारी रोजी मिराई लॉन, जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १९ वधू-वरांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाष्टक व वेदघोषाने झाली. सर्व विवाहविधी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या १० बैलगाड्यांनी दिमाखात आणि शिस्तबद्धरित्या पार पाडण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक यांचा सत्कार देखील करण्यात आला. समाजबांधव, नातेवाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख स्वागत…

Read More

पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजण्याचा कट रचला, मात्र या घटनेत तिचा पती समोनाथ लोहार दुर्दैवी मृत्युमुखी पडला. पोलिसांनी मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस तपासानुसार, सारिका आणि शेखर यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते, ज्याला समोनाथ लोहार यांची सासू विरोध करत होती. यामुळे पत्नीने शेखरच्या सूचनेनुसार १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात भेट घेऊन पांढऱ्या रंगाचे विषारी औषध अर्धवट भरलेल्या बिस्लरीच्या बाटलीत घेतले. रात्री आठच्या सुमारास घरात कोणीही…

Read More

जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जळगाव । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिक्षण करण्यासाठी हॉटेलवर वेटर म्हणून कामाला असलेल्या तरुणाने राहत्या खोलीमध्ये जीवनयात्रा संपविली. प्रवीण तुलसीदास राठोड (वय १९, रा. आदर्श नगर) असं मयत तरुणाचं नाव असून तो बारावीचे पेपर देत होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धानवड येथील रहिवासी असलेला प्रवीण राठोड हा तरुण जळगावात हॉटेलवर कामाला होता. वडील बारलेले असल्याने पुढील शिक्षणासाठी तो वेटरचे काम करीत होता. तो बारावीचे पेपर देत होता. हॉटेलमालकाच्या आदर्श नगरातील घरात भाडे तत्वावर सोबत काम करणार्या घेऊन या तरुणासह राहत होता. १९ रोजी रुममधील तरुण बाहेर…

Read More

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी, जळगाव । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच शहरातील दोन वाइन शॉपची शटर फोडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत सराईत आरोपी रामनिवास मंजू गुप्ता (३७, रा. कल्याण, जि. ठाणे) याला अटक करून त्याच्याकडून रोख २ लाख ४ हजार रुपये व दुचाकी हस्तगत केली आहे. याबाबत असे की, भजेगल्लीतील विजय चौधरी यांच्या मालकीच्या प्रिन्स वाइनशॉपच्या शटरच्या…

Read More

खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स उत्साहात जळगाव : २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या क्रीडांगणावर खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अवयवदानाबद्दल जनजागृती करणे तसेच अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण लाभार्थी यांच्या आरोग्य व जिद्दीचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेत एकूण ४०० विद्यार्थ्यांसह २० अवयवदाते आणि प्रत्यारोपण लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक व्हि. एल. माहेश्वरी (कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), प्राध्यापक एस. टी. इंगळे (प्र-कुलगुरू), दीपमाला काळे (महापौर, जळगाव महानगरपालिका), डॉक्टर नरेंद्र ठाकूर (लोकनियुक्त नगराध्यक्ष, एरंडोल), प्राध्यापक अनिल डोंगरे (अधिष्ठाता, कॉमर्स आणि…

Read More

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वार्षिक पारितोषिक वितरण जळगाव प्रतिनिधी : जळगाव येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री. अे.पी. चौधरी तर उद्‌घाटक म्हणून जळगाव शहर महापालिकेच्या महापौर सौ. दिपमाला काळे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींनी विविध कौशल्य विकसित करून व्यक्तिमत्व विकासात वाढ करावी, असे आव्हान केले.यानंतर प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अे पी. चौधरी “विद्यार्थिनी सांस्कृतिक…

Read More

झोपेची खाट टाकून अनोखे होणारे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या तत्परतेने स्थगित. भुसावळ प्रतिनिधी – सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने तात्काळ कारवाई होण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारदार प्रमोद पाटील यांनी दिला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी तक्रारीची दखल घेत भुसावळ तहसीलदार आणि मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांना लेखी पत्र काढून तात्काळ स्थळ निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल सत्वर सादर करावा असे कळविल्याने खाट टाकून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले . भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार भुसावळ आणि मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांना दिलेल्या लेखी…

Read More