Author: Editorial Desk

राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला भुसावळ प्रतिनिधी : 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेने च्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली सर्वप्रथम श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्या नन्तर आपल्या सम्भाषणात दामोदर राजपूत यांनी घराघरात शिवाजी राजे घडवा या विषयावर सम्भाषण केले तसेच जिल्हा अध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनी आपल्या भाषणात प्रत्येक आई ने आपल्या पोटी आलेल्या मुलाला शिवबा सारखे संस्कार द्यावेत या विषयावर भाष्य केले नन्तर सर्व पदाधिकाऱ्यांनी वदंन केले. या प्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिकाताई…

Read More

भव्य चित्रकला व किल्ले बनविण्याच्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य चित्रकला व किल्ले बनविण्याच्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने परिसरात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्य स्थापना, देशभक्ती, किल्ले व विविध ऐतिहासिक प्रसंग या विषयांवर कल्पकतेने चित्रे रेखाटली. चित्रकला स्पर्धेत एकूण ९८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये गट क्र. १ (इ. १ली ते ५वी)…

Read More

आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ जळगाव । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. यातच आता भुसावळ जळगाव मार्गे धावणाऱ्या बडनेरा ते नाशिक रोड अनारक्षित गाडीसह साईनगर शिर्डी-बिकानेर आणि मुंबई–रिवा या साप्ताहिक गाडीच्या सेवेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बडनेरा–नाशिक रोड-बडनेरा मेमू मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू गाडी यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही गाडी ०१ मार्च ते १५ जुलै २०२६ या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे,…

Read More

रिंग रोडच्या कामादरम्यान दुर्दैवी घटनेचा थरार डंपर घरावर पलटल्याने घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला असल्याची भीषण दुर्घटना पुण्यातील मुळशीत रिंग रोड कामादरम्यान घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे. मिळालेली माहितीनुसार, मुळशी तालुक्यात रिंग रोडचे रस्त्याच्या भरावाचे काम सुरू होते. यादरम्यान डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून…

Read More

शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर, तथा नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कलावंतांना भेडसावत असणारी प्रश्न सोडवण्यासाठी आपण कलावंत सोबत खंभिरपणे उभे असून लवकरच सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर, तथा नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले. भंगाळे यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात शहरातील कलावंतांनी आपल्या समस्यांबाबत त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलेत होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे तसेच ऋषिकेश सोनवणे, आकाश बाविस्कर यांच्या विष्णू भंगाळे यांनी चर्चा झाली. बैठकीत कलावंतांना ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी जाणून घेतल्या. दरम्यान नव्या जोमाने नव्या पिढीला नाट्य चळवळ सुरू राहील अशी कायमस्वरूपी उपाययोजना…

Read More

एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना जळगावात एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना अवघ्या काही तासांत उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विजेच्या वेगाने कारवाई करत दोन प्रौढ आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पीडितांची सुखरूप सुटका केली. ही माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२) यांना आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. जळगाव) याने १५ फेब्रुवारी रोजी चलाखीने जाळ्यात ओढले. त्याने प्रथम फिर्यादींचा भाचा गणपतलाल माली (वय १९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर…

Read More

108 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे, रावेर पाल प्रतिनिधी : अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी 108 चैतन्य साधक परिवारासह फक्त 108 दिवसातच 3500 की. मी अंतराची पैदल माँ नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याने देशभरातील भाविकामध्ये त्यांचे कौतुक करण्यात येत असून ही परिक्रमा निर्विघ्न पार पाडून दि :-17 फेब्रुवारी रोजी पाल येथील त्यांच्या श्री वृंदावन धाम आश्रमात आले असता त्यांचे चैतन्य युवा उत्सव समिती पाल तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी श्रधेय बाबाजीचे…

Read More

बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या मागील बाजूने दहा ते पंधरा जणांनी प्रवेश करत खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या तसेच लोखंडी गेटची तोडफोड केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राच्या…

Read More

तालुक्यातील २१ कोटी ४८ लाखांच्या भरपाईचा अहवाल सादर मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुक्यातील मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजना मनूर या योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या मुक्ताईनगर येथील पंप हाउस मध्ये शासकीय साहित्याची बेकायदेशीर तोडफोड आणि चोरी झाल्याच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी सविस्तर चौकशी अहवाल सादर केला असून, या संपूर्ण नुकसानीची आणि योजनेच्या पुनरुज्जीवनाची किंमत २१ कोटी ४८ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या अहवालामुळे या प्रकरणातील संशयास्पद भूमिका घेणारे अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, खामखेडा पुलाजवळ असलेल्या या योजनेच्या पंप…

Read More

दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्याची संधी द्या – संजय सावकारे राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत वरणगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वितरण कार्यक्रमात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल व व्हिल चेअर वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवणे आणि समाजातील सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. कार्यक्रमात बोलताना मंत्री सावकारे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही अद्वितीय देणगी असते. चालता येत नसल्यामुळे किंवा शरीरदृष्ट्या अडचणी असल्या तरी दिव्यांग व्यक्तींची बुद्धी, कौशल्ये आणि क्षमता इतरांपेक्षा कमी नाहीत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या साधनांमुळे त्यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक…

Read More