अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम पारोळा प्रतिनिधी : दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
Author: Nilesh Ajmera
जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार NH-53 – हा सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा) पर्यंतचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून जो धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो. आणि हाजिरा बंदराला पारादीप बंदराशी जोडतो. NH-753F – हा महामार्ग जळगावहून पहूर, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वडाळा, अहिल्यानगर, पुणे, मावळ, दिगी पोर्टपर्यंत आहे. जळगावमधून पुणे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या महामार्ग आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबई किंवा नागपूरकडे कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस हायवे अस्तित्वात आल्यानंतर जळगावहून पुण्याला देखील अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होणार…
बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने बिलासपूर-मडगाव, बिलासपूर-वलसाड मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावर प्रत्येकी ८ अशा एकूण १६ विशेष रेल्वे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान धावतील. या गाड्यांना जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसबिलासपूर-मडगाव (०८२४१) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसच्या २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान आठ फेऱ्या होतील. ही रेल्वे प्रत्येक शनिवारी बिलासपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता मडगाव…
संतोष चौधरींचा ‘सस्पेन्स’ आणि मास्टरस्ट्रोक ; फडणवीसांची सभाही ठरली निष्प्रभ! भुसावळ प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल भुसावळ येथे लागला असून मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना पराभवाचा मोठा फटका बसला असून यातून माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या कधी काळच्या चेल्याला धोबीपछाड मारला आहे. भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत यंदा जबरदस्त लढत झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. यावरून विरोधकांनी टिका केली. आणि निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. तर निवडणुकीच्या प्रारंभीच भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा…
उच्च शिक्षित दामिनी सराफ नगराध्यक्षपदी विराजमान फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. एकूण जागांपैकी भाजपाला ९ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत आमदार अमोल जावळे यांच्या वर्चस्वाखाली भाजपाच्या उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ यांनी १०,०८७ मतांसह दणदणीत विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. कंसात राजकीय पक्ष व मिळालेली मते. प्रभाग १ अ : तडवी हकिम एमत (राष्ट्रीय काँग्रेस) – १,८३७ मतेप्रभाग १ ब : शेख सुमईय्या बी कुरबान (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार…
उद्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींची मतमोजणी व निकाल जळगाव : जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सहा नगरपरिषदांमधील काही जागांच्या निवडणुका न्यायालयीन अपील व इतर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली असून, माघारीनंतर तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी आज शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या नऊ जागांसह २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींतील एकूण ४५२ नगरसेवक पदे तसेच १७ ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निकालाबाबतची नागरिकांची उत्सुकता अखेर संपणार आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे…
संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये माध्यमिक विभागातर्फे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क, जबाबदारी आणि लोकशाहीतील सहभागाचे महत्त्व याबाबत उपशिक्षिका रूपाली आव्हाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. “मतदान करा, लोकशाही बळकट करा” या संदेशासह विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व प्रतिज्ञा घेत मतदार जनजागृती केली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार जागृत, शिक्षित आणि जबाबदार नागरिक बनून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे हेच मतदानाचे खरे महत्त्व आहे…
शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. जळगाव शहरातील कालिका माता परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण आगीची घटना घडून परिसरात मोठी खळबळ उडाली. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, स्टेट बँकेसमोरील पत्र्याच्या शेडखाली असलेल्या काही दुकानांना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीचे लोळ काही मिनिटांतच वेगाने पसरले. त्यामुळे पत्र्याच्या शेडखालील सलग असलेली दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेत व्हीनस ऑप्टिकलचे गणेश राणे, भगवती ऑटोमोबाईलचे पुष्पक खडके, श्री विघ्नहर्ता स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसेसचे भूषण वाघुळदे तसेच सखी मॅचिंग सेंटरचे प्रदीप खडके यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भगवती ऑटोमोबाईलचे मालक पुष्पक खडके यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वीच स्पेअर पार्ट विक्रीचा नवा…
भाजप उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा नवा अंतर्गत संघर्ष उभा ठाकल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये तब्बल पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी लावली असून, अजूनही अनेक जण रांगेत असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांत उद्धव सेनेसह इतर पक्षांतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, सुनील महाजन आणि प्रशांत नाईक या माजी नगरसेवकांच्या आगमनामुळे पक्षाची ताकद वाढली असली, तरी मूळ व वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावेळच्या…
संजय सोनवणे निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारा ट्रॅक्टर आणि एका मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या दुर्दैवी मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोनवणे हे जळगाव येथील मालधक्क्यावर सिमेंटच्या गोण्या भरण्याचे व उतरवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसह सिमेंट भरलेला ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 6078) घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. तिथे सिमेंट खाली करून जळगाव शहराच्या दिशेने परतत असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव…

