Author: Editorial Desk

पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया काल २२ फेब्रुवारी रोजी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली. भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांचा उत्साह दिसून आला. १७१८ महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १२२४ उमेदवार हजर राहिल्या. यामध्ये १६९ उमेदवार शारीरिक मोजमापात(वयोमर्यादेसह) तर मैदानी चाचणीत ६८४ उमेदवार अपात्र ठरल्या. ३७१ महिला उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या. शेवटच्या दिवशीही चोख बंदोबस्त आणि…

Read More

एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला जळगाव । जळगावसाठी अभिमानाची बाब म्हणजे शहरातील एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या हस्ते सहारा स्टार मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कल्पना शिंदे आणि रामकृष्ण रामदास शिंदे (माजी लाईन चेकिंग ऑफिसर, जळगाव) यांचे सुपुत्र असलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाचे आणि जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द…

Read More

चेक बाऊन्स प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ : महाराष्ट्र अव्वल अभिनेता राजपाल यादव यांना चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावे लागले होते. सुमारे 9 कोटी रुपयांचे कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे आणि दिलेले धनादेश वटले नसल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात चेक बाऊन्सच्या वाढत्या घटनांबाबत मोठी चर्चा रंगली. सध्या कर्ज घेऊन त्याची परतफेड न करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुण पिढी कर्ज घेण्यात आघाडीवर आहे. अनेक प्रकरणांमध्ये मासिक उत्पन्नाच्या तुलनेत शंभरपट अधिक रकमेचे कर्ज घेतल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, पुढे जाऊन हेच हप्ते भरताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशात चेक बाऊन्सच्या प्रकरणांत वाढ…

Read More

जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गावाजवळील रस्त्यावरून जात होती. यावेळी संशयित आरोपी सुरेश बळीराम पाटील याने तिचा पाठलाग केला. महिलेला वाटेत अडवून त्याने अश्लील मागणी केली. “तुला किती पैसे लागतील ते देतो, माझ्यासोबत चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केला. जातीवाचक शिवीगाळ आणि…

Read More

करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई चाळीसगाव प्रतिनिधी : करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई केली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ५ हजार रुपये किमतीची सव्वा ब्रास वाळू तसेच अंदाजे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय शिंदे, तुकाराम चव्हाण, ओंकार सुतार, प्रविण सपकाळे, पो.कॉ. श्रीराम कांगणे आदीं नी केली आहे . शुक्रवारी (दि. २०) रात्री १० वाजेच्या सुमारास करगाव येथील लांबे–वडगाव रस्त्यावर…

Read More

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी ! जळगाव | निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्सव दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील सर्व समाज संस्था, संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी संत गाडगेबाबा उद्यान येथून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे, नगरसेवक सर्वश्री नितीन लढ्ढा,अरविंद देशमुख,कल्पेश सोनवणे, गणेश सोनवणे, दिपक सूर्यवंशी, अमर जैन, विशाल भोळे, विष्णू भंगाळे, निलेश तायडे, डॉ. विरेन खडके, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील व चेतन शिरसाळे, भूषण सोनवणे,…

Read More

महिनाभराच्या दहशतीनंतर ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास…! भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या महिनाभरापासून एका बिथरलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाच्या हल्ल्यात सुमारे ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित माकडाला जेरबंद करून जंगलात सोडले. माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी माकडांची एक टोळी गावात आली होती. त्यातील इतर माकडे निघून गेली; मात्र एक माकड गावातच थांबले. हे माकड आक्रमक बनून घरांच्या किचनमध्ये शिरणे, अन्नसामग्रीची नासधूस करणे तसेच एकट्या व्यक्तींवर हल्ला करणे असे प्रकार करत होते. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून एका व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती…

Read More

शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली सावदा, ता रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक वनसंरक्षक यावल समाधान पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे, मानद वन्यजीव रक्षक जळगाव रविंद्र फालक पशुधन विकास अधिकारी डॉ रणजीत पाटील डॉ स्नेहल मोटेगावकर डॉ प्रदीप काळे डॉ राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासकअमन गुजर व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधित बिबट मृत अवस्थेत असल्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घोषित केले.…

Read More

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. सत्ताधारी पक्षातर्फे आयोजित केलेल्या चहापाणीच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनात संदर्भात माहिती दिली. विरोधकांतर्फे कोंढवा जमीन प्रकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे प्रकरण गाजणार आहे. कोंढवा जमीन प्रकरणात खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण गाजणार आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. की खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट देऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा या अधिवेशनात उचलला जाणार आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर…

Read More

इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. जळगाव | करिअरची स्वप्ने डोळ्यांत साठवून महाराष्ट्रातून चेन्नई येथे नामांकित आयटी कंपनी Cognizant मध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. शनिवारी (दि. २१) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईतील पाँडिचेरी रोडवरील गोल्डन बीच परिसरात घडली. महाराष्ट्रातील सुमारे १५ विद्यार्थ्यांचा गट येथे फिरण्यासाठी गेला होता. समुद्रकिनारी उसळणाऱ्या लाटांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात असताना १० ते १५ फुटांची प्रचंड लाट उसळली आणि तिघांना खोल समुद्रात ओढून नेले. या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) हिचा मृत्यू झाला.…

Read More