Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे.

ताज्या बातम्या

जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे.

Editorial DeskBy Editorial DeskDecember 24, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे. याच दरम्यान, अमळनेर शहरात विविध दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अंकलेश्वर येथून अटक केली आहे. प्रशांत जगन वालडे (मूळ रा. गोरगावले ता. चोपडा व हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे.

शहरातील मध्यवस्तीत बाजारपेठेत नुकतीच चार ते पाच दुकाने पत्रा कापून, शेड कापून फोडण्यात आली होती. त्यातील वस्तू महागडा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेल्याने शहरात खळबळ माजली होती. या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना एक संशयित चोरी करताना आढळला. त्याचा चेहरा पाहिला असता तो प्रशांत जगन वालडे असा आढळून आला.

त्याने पाने यापूर्वी देखील अनेक चोऱ्या केल्या असून चोरी करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या अटकेमुळे शहरातील चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस निरीक्षक निकम यांनी प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, गणेश पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, विनोद संदानशीव या पोलिसांच्या पथकाला अंकलेश्वर येथे चोरांचा शोध घेण्यासाठी पाठवले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रशांत वालडे याचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला अंकलेश्वर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add