Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जळगाव

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 24, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,

जळगाव : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्या निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात आगी व रासायनिक आपत्तींच्या नियंत्रणासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नुकतेच विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत एमआयडीसीमधील सर्व सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अग्निशमन विभाग, तसेच जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या माध्यमातून टेबल टॉप मीटिंग, मॉकड्रील व रासायनिक आपत्ती विषयक सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत जळगाव एमआयडीसी येथील आर.जे. फूड्स येथे टेबल टॉप मीटिंगचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL), MIDC येथे प्रत्यक्ष मॉकड्रील राबविण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रोहन घुगे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच इतर ठिकाणी उद्भवू शकणाऱ्या विविध आगीसारख्या आपत्ती व त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण, तयारी व विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपुरे, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक झोपे, उपअभियंता गांधिले, उपविभागीय अधिकारी एरंडोल मनिष कुमार गायकवाड, नायब तहसीलदार लक्ष्मन सातपुते, NDRF पुणेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पुनिया, BPCLचे जगताप, नितीन आमले, तसेच मनपा अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add