Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

जळगाव

आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Editorial DeskBy Editorial DeskDecember 26, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मुक्ताईनगरात बनावट नोटाही मोठया प्रमाणात हस्तगत

मुक्ताईनगर प्रतिनिधी : समाजमाध्यमांवरून “एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी चा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे .या कारवाईत त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कुन्हा दुरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवरून आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केले होते.

या व्हिडीओंमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. या आमिषाला बळी पडलेल्या देशातील विविध भागांतील नागरिकांना संबंधित भागात बोलावून त्यांना मारहाण करून रोख रक्कम व साहित्य लुटल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते.या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडीओंचा शोध सुरू केला.

दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी “Saawariya Set” या फेसबुक प्रोफाइलवरून २८ सेकंदांचा एक व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. या व्हिडीओमध्ये “एक लाख का दस लाख मिलेगा, जिसे खरीदना है वही कॉल कीजिए” असे आमिष दाखवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला असता, लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथील
१) शिवकुमार शमी भोसले,
२) देवकुमार शिवराज भोसले
आणि
३) सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले
यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ४२०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींच्या ताब्यातून “CHILDREN BANK OF INDIA – पाचशे रुपये” असे लिहिलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. या घटनेत आणखी काही याच भागातील आरोपी असण्याची शक्यता आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add