Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली.

राजकारण

अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली.

Editorial DeskBy Editorial DeskDecember 27, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रूमची अधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली. यावेळी मतमोजणीचे टेबल कसे लावले जातील, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मतमोजणी अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था कशी असेल याची माहिती शहर अभियंता यांनी यावेळी दिली.

महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम सिलींग, सेटींगपासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व व्यवस्था कशी असेल, याची पाहणी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरीक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले, आर. टी. पाटील, निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, महेश चौधरी, निवृत्ती गायकवाड, श्रीमती घाटगे यांनी शुक्रवारी दुपारी केली. महापालिकेची मतमोजणी एमआयडीसीमधी वखार मंडळाच्या गोडावून मध्ये होणार आहे. तेथून मशिन सिलींग सेंटींगपासून ते मतमोजणी होईपर्यंत कशी यंत्रणा काम करेल याचा सर्व आढावा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतला.

यासंदर्भात प्लॅन तयार करण्यात आला असून त्या नकाशाच्या माध्यमातून आसन व्यवस्था, मतमोजणीचे टेबल कुठे असतील या सर्वांनी माहिती समजून घेतली. तसेच निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या ३५०० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे संभाजीराजे नाट्यगृहाची देखील पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add