Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»‘वंदे मातरम ’, ‘आत्मनिर्भर भारत’

ताज्या बातम्या

‘वंदे मातरम ’, ‘आत्मनिर्भर भारत’

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

प्रजासत्ताक दिनी ,२,५०० कलाकारांचे सादरीकरण

जळगाव । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन जयघोषांनी दुमदुमणार आहे. परेडची संकल्पना ‘वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र’, , ‘वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. ३० सजीव देखावे असंतील, त्यापैकी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील, तर १३ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील. याव्यतिरिक्त, अंदाजे २,५०० कलाकार सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

यावर्षी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-युरोप संबंधांना चालना मिळेल. गेल्या वर्षी परेडमध्ये सहभागी होऊ न शकलेली अनेक राज्ये यावेळी त्यांचा सांस्कृतिक वारसा दाखवतील. यामध्ये आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, केरळ आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, राजस्थान आणि तामिळनाडू येथील सजीव देखावे देखील प्रमुख आकर्षण असतील. आसामच्या आशीर्कडी गावातील पारंपारिक हस्तकला अधोरेखित केल्या जातील. पश्चिम बंगाल स्वातंत्र्यलढ्यात बंगालची भूमिका दाखवेल.

‘वंदे मातरम्’ची १५० वर्षे
संचलनाची थीम वंदे मातरम्ची १५० वर्षे असणार आहे. यामध्ये तेजेंद्रकुमार मित्रा यांनी १९२३ मध्ये वंदे मातरम्चे चित्रण करणाऱ्या आणि वंदे मातरम् अल्बम (१९२३) मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रांची मालिका कर्तव्य पथावर व्ह्यू-कटर म्हणून प्रदर्शित केली जाईल. परेडच्या शेवटी वंदे मातरम् बॅनर असलेले फुगे हवेत सोडण्यात येतील. संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी यावर्षीच्या उत्सवासाठी नियोजित उपक्रमांची रूपरेषा पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add