Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अभाविप देवगिरी प्रांताध्यक्षपदी प्रा. डॉ. सुरेश मुंढे ,

जळगाव

अभाविप देवगिरी प्रांताध्यक्षपदी प्रा. डॉ. सुरेश मुंढे ,

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 19, 2026Updated:January 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे आता प्रांतमंत्री

जळगाव । प्रा. डॉ. सुरेश मुंढे व डॉ. वरुणराज नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी २३ जानेवारीला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात जबाबदारी स्वीकारतील.

प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत. मॉस्को येथे झालेल्या चर्चासत्राच्या निमित्ताने त्यांनी विदेश यात्रा केली आहे. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची हिंदी साहित्यातील १८ पुस्तके प्रकाशित आहेत राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय नियतकालिकामधून ५५ शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत.

नूतन प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे मूळ जळगाव येथील आहेत. ते २०१८ पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात असून सध्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. पूर्ण करत आहेत. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर काढण्यात आलेल्या वसतिगृह शुल्क वाढ, परीक्षा व मूल्यमापन मधील अनियमितता विरोधातील आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखाली तसेच आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय येथे विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधातील आंदोलन, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायतत्ते वर घाला घालणाऱ्या सरकार विरोधातील आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add