Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शहरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार

जळगाव

शहरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

दारूसाठी पैसे नाकारल्याने वृद्धावर शस्त्राने हल्ला; गुन्हा दाखल !

जळगाव – शहरातील संत चोखामेळा बोर्डिंग जवळील पेट्रोल पंपासमोर एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिनेश काशीनाथ अहिरे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त जात असताना, आरोपी शेखर मराठे (रा. कासमवाडी, जळगाव) याने त्यांना सार्वजनिक रस्त्यावर अडवले. आरोपीने अहिरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अहिरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीचा राग अनावर झाला. पैसे मिळत नसल्याचे पाहून आरोपी शेखर मराठे याने फिर्यादींना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी दिनेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी शेखर मराठे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add