Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावमध्ये आणखी एका कुंटणखाण्याचा पर्दाफाश ;

जळगाव

जळगावमध्ये आणखी एका कुंटणखाण्याचा पर्दाफाश ;

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई

जळगाव । जळगावमध्ये आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी यांच्या पथकाने जळगावच्या पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. तर संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंप्राळा भागात एका ठिकाणी छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यावरुन बारीवाडालगत बैरागी नामक महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. त्याला खात्री करून मोबाइलवर मिस कॉल देण्यास सांगण्यात आले.

त्याप्रमाणे मिस कॉल येताच पथक व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह व चार महिला आढळल्या. छापा टाकत असताना घराला असलेल्या तीन दरवाजांचा फायदा घेऊन एक ग्राहक पळून गेला. पोलिसांनी या ठिकाणाहून पश्चिम बंगालची २८ वर्षीय तरुणी, सुरत येथील ३० वर्षीय महिला व जळगावातील ३५ वर्षीय दोन महिलांची सुटका केली. तसेच या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या पथकाने केली कारवाई :
या यशस्वी कारवाईमध्ये विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतन हरी गिते, रवींद्र मोतीराया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add