Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»वनपाल राजेंद्र सरदार व पंटर दीपक तायडे याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

जळगाव

वनपाल राजेंद्र सरदार व पंटर दीपक तायडे याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

15 हजाराची लाच घेताना वनपाल आणि खासगी पंटर जाळ्यात

जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच रावेर तालुक्यात १५ हजाराची लाच स्वीकारताना वनपाल आणि खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे अशी लाचखोरांची नावे असून याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकार काय?
तक्रारदार यावल वन विभागात जिन्सी (ता. रावेर) वनक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत असताना, यावल येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणीच्या कामाची तपासणी केली होती. तेव्हा वनपाल राजेंद्र सरदार याने तक्रारदाराला व्हाटसॲप कॉल करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील निंदणीच्या कामावरून निलंबित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच निलंबन टाळायचे असेल तर वनपरिक्षेत्र अधिकारी बावणे यांना १५ हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची रक्कम खासगी पंटर दीपक तायडे याच्याकडे फोन पे द्वारे देण्याची सूचना केली होती.

मात्र, तक्रारदार फोन पे वापरत नसल्याने त्याने स्वतःच्या भ्रमणध्वनीमधील योनो ॲपमधून १३ हजार २५० रूपये खासगी पंटर तायडे याच्याकडे पाठवले. त्याचा स्क्रीन शॉटही त्याने वनपाल राजेंद्र सरदार यास टाकला. याशिवाय उर्वरित १७५० रूपयांची रोख रक्कम अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी जाऊन वनपाल सरदारला दिली. अशा प्रकारे सरदार याने एकूण १५ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन रितसर लेखी तक्रार केली. त्यानुसार, पडताळणी केल्यावर वनपाल राजेंद्र सरदार यांनी पंचांसमक्ष सापळा पथकासमोर तक्रारदाराकडून भ्रमणध्वनीवरून १३ हजार २५० रूपये आणि रोख १७५० रूपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून वनपाल सरदार आणि खासगी पंटर तायडे यांच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, हवालदार किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी करत या दोघांना अटक केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add