Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»लाडक्या बहिणींसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय;

जळगाव

लाडक्या बहिणींसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय;

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली गुडन्यूज

जळगाव । २१ जानेवारी २०२६ । राज्य सरकारने २०२४ साली राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहि‍णींना वेळोवेळी eKYC करावी लागते. केवायसलीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत. केवायसी करुनदेखील पैसे मिळत नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आहे. दरम्यान, आता महिलांच्या या नाराजीनंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?
आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे की, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती… महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु काही कारणांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळेच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरेंच्या या घोषणेमुळे आता महिलांना केवायसी करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. त्यांना ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष पडताळणी करुन केवायसी करता येणार आहे. यामुळे सर्व महिलांची पडताळणी होईल आणि महिलांना पैसे मिळतील.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add