Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जलतारा, शोषखड्डे व लोकोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन

जळगाव

जलतारा, शोषखड्डे व लोकोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

समृद्ध पंचायत राज अभियानात अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचा जळगाव दौरा

जळगाव | प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी, प्रचार व जनजागृतीसाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात एरंडोल तालुक्यातील गालापूर, पाचोरा तालुक्यातील वडगाव करे तसेच जामनेर तालुक्यातील गारखेडा या ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलतारा, शोषखड्डे, डिजिटल ग्रामपंचायत आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनाल करणवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘चला ग्रामपंचायत’ अंतर्गत सुरू असलेल्या डिजिटलायझेशन उपक्रमांची माहितीही यावेळी घेण्यात आली.

जिल्ह्यातील तिन्ही गावांमध्ये सोनाली कुलकर्णी यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमळ प्रतिसादाने त्या भारावून गेल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत समृद्ध पंचायत राज अभियानात अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले.

एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे सोनाली कुलकर्णी यांची घोडागाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकानेही खेळ सादर करत रंगतदार स्वागत केले.

तिन्ही ग्रामपंचायतींना भेट दिल्यानंतर तेथील विकासकामे, स्वच्छता, जलसंधारण व लोकसहभागातून सुरू असलेली प्रगती पाहून सोनाली कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. “ग्रामीण भागात ग्रामपंचायती विकासाची भक्कम पावले टाकत आहेत, हे पाहून आनंद वाटतो,” अशा शब्दांत त्यांनी ग्रामपंचायतींचे कौतुक केले.

दरम्यान, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे आयोजित कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी, तसेच धुरमुक्त गाव योजनेतील लाभार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागामार्फत गर्भवती मातांना पोषण किटचे वाटपही करण्यात आले. समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add